शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गवळीपुऱ्यात बिलकीस बानो विजयी

By admin | Updated: November 3, 2015 01:53 IST

महापालिका प्रभाग क्र. २६ गवळीपुरा येथे सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत

अमरावती : महापालिका प्रभाग क्र. २६ गवळीपुरा येथे सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार बिलकीस बानो हमजा खाँ विजयी झाल्या आहेत. त्यांना १८१२ मते मिळालीत. या पोटनिवडणुकीवरून मुस्लीमबहुल भागात काही दिवसांपासून तापलेले वातावरण सोमवारी शमले, हे विशेष. दरम्यान निवडणूक निकालानंतर ‘पतंग तनली’ अशी चर्चा परिसरात सुरू होती. नेहरु मैदानातील महापालिका शाळेत सोमवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या फेरीपासून अपक्ष उमेदवार बिलकीस बानो आघाडीवर होत्या. ही आघाडी त्यांनी अंतिम फेरीपर्यंत कायम ठेवली. पोटनिवडणुकीत एकूण चार महिला उमेदवार रिंगणात होत्या. यात अपक्ष बिलकीस बानो हमजा खॉ यांना १८१२ मते, अपक्ष उमेदवार आसिया अंजुम वहीद खान यांना १५०९, काँग्रेसच्या शेख खातून बी शेख हातम यांना ८८२ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेख शाहीन परवीन शे. करीम यांना १८३ मते मिळालीत. निवडणुकीत २२ मतदारांनी नकारात्मक (नोटा) मतदान केले. ८ हजार ३७५ पैकी ४ हजार ४०८ मतदारांनी मतदानात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला होता. अवघ्या दीड तासांत मतमोजणी प्रक्रिया आटोपली. ढोल ताशे, आतषबाजीला फाटा४रविवारी मतमोजणी सुरू होताच अपक्ष उमेदवार बिलकीस बानो विजयी होणार, हे स्पष्ट झाले होते. त्यांच्या त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. मात्र, साबणपुऱ्यातील युवकाची रविवारी उशिरा हत्या झाल्याने विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी ढोले-ताशे, फटाक्यांच्या आतषबाजीला फाटा देत साध्या पध्दतीने विजय साजरा केला.प्रस्थापित पक्षांसाठी वेगळा संदेश ४सन २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून गवळीपुरा प्रभागातील पोटनिवडणुकीला महत्त्व आले होते. त्याच अनुषंगाने नेते प्रचाराला लागले होते. निवडणुकीदरम्यान अंतर्गत राजकारण ढवळून निघाले असतानाच अपक्ष उमेदवार विजयी झाल्याने राजकीय पक्षांपर्यंत वेगळा ‘संदेश’ गेला आहे.