शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बहिरमच्या रिंगण सोहळ्यात वारकऱ्यांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 20:43 IST

वारकरी सांप्रदायात रिंगण सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा रिंगण सोहळा विदर्भात अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील बहिरम या तीर्थक्षेत्री मागील वर्षीपासून सुरू झाला आहे.

ठळक मुद्दे५० हजार वारकरी६९ वर्षीय वृद्धा ठरली रिंगणप्रदक्षिणेचे आकर्षण

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : वारकरी सांप्रदायात रिंगण सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा रिंगण सोहळा विदर्भात अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील बहिरम या तीर्थक्षेत्री मागील वर्षीपासून सुरू झाला आहे. त्यामुळे वारकऱ्यांसाठी ही एक पर्वणीच असते. या आनंदोत्सवाला विदर्भातील वारकऱ्यांची मोठी गर्दी होती.अश्वाच्या पायाखालील माती मस्तकी धारण करण्यासाठी, तसेच ती माती तुळशीवृंदावनात ठेवण्यासाठी गुरुवारी ५० हजार वारकऱ्यांनी अश्वरिंगण सोहळ्याला हजेरी लावली.सर्व पालख्यांचे, दिंड्यांचे व रिंगण सोहळातील दोन अश्वांचे पूजन बहिरम बाबाच्या मंदिरात संस्थेच्या अध्यक्षांनी केली. तेथून सर्व पालख्या, दिंडी मार्गाने 'जय जय राम कृष्ण हरी'च्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष करीत बैतूल मार्गावरील रिंगण सोहळ्यात पोहोचली. सर्व पालखी, दिंडीचे यावेळी पूजन करण्यात आले.याप्रसंगी सर्वप्रथम पताका धारक वारकऱ्यांनी रिंगनसोहळ्यात प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर मृदंग वादकांनी मृदंग गळ्यात घेऊन रिंगण प्रदक्षिणा केली. या रिंगण सोहळ्याची विशेष बाब म्हणजे अस्वा आधी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन तालुक्यातील पिंपरी येथील ६९ वर्षाच्या गिताबाई ठाकरे या माऊलीने रिंगण प्रदक्षिणा धावून पूर्ण केल्या. ही माऊली आजचा रिंगण सोहळ्याची आकर्षण ठरली. त्यानंतर अश्व रिंगणाचा सोहळा सुरू झाला. आळंदी येथील चिंचोळे सरकार यांचे माऊलीच्या दोन अश्?वांनी रिंगण सोहळ्यात पाच धाव प्रदक्षिणा पूर्ण केल्या.अश्व रिंगणात धावताच ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराजांच्या जय घोष टाळ-मृदंगाच्या साथीने आसमंत दुमदुमला. रिंगन सोहळ्याप्रसंगी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी बहिरम बाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेंद्र पाटील चौधरी, किशोर ठाकरेंसह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या रिंगण सोहळ्यात येथील भक्तधामचे संत गुलाबराव महाराज, लाखनवडी येथील गुणवंत महाराज यांचा पालखीसह २७ दिंड्या सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :cultureसांस्कृतिक