शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बहिरम यात्रा भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:18 IST

फोटो परतवाडा : बहिरमची यात्रा नव्या वर्षात भरणार असून, त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांकडून मान्यता घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यासह अमरावती ...

फोटो

परतवाडा : बहिरमची यात्रा नव्या वर्षात भरणार असून, त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांकडून मान्यता घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यासह अमरावती विभागातील यात्रा, उत्सव आयोजित करण्यास परवानगी देण्याबाबतचा शासननिर्णय, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांनी २४ डिसेंबरला निर्गमित केला आहे.

यात्रा, उत्सव आयोजित करण्यास परवानगी देण्याबाबत हा शासनाचा सकारात्मक निर्णय राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने नागरिकांसाठी पालन करावयाची आवश्यक ती मानद कार्यप्रणाली लक्षात घेण्यास या २४ डिसेंबरच्या निर्णयात सुचविण्यात आले आहे.

राज्यात यात्रा, उत्सवांना सुरुवात झाली आहे. १४ ऑक्टोबरच्या शासन आदेशान्वये राज्यातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे सुरु करण्यात अनुमती देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचे २९ ऑगस्टचे आदेशही निर्गमित आहेत. राज्याच्या विविध भागांतून यात्रा, उत्सवास परवानगी देण्याबाबत प्रस्ताव प्राप्त होत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने त्या-त्या जिल्ह्यातील यात्रा, उत्सव आयोजित करण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय घ्यावा, असे २४ डिसेंबरच्या निर्णयात (आदेशात) स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात सर्वाधिक दिवस चालणारी व २० डिसेंबरपासून सुरू होणारी बहिरम यात्रा यंदा कोरोनाच्या अनुषंगाने पहिल्यांदा रद्द करण्यात आली. यात्रा परिसरात हंडीतील भाजी आणि रोडग्याच्या जेवणालाही मनाई केली गेली. राहुट्या टाकण्यासही मज्जाव केल्या गेला. यामुळे अनेक व्यावसायिकांचा रोजगार बुडाला. रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्यावरून यात्रा परिसरातील, लगतच्या पंचक्रोशीतील लोकांनी, युवकांनी, राजकीय लोकप्रतिनिधींनी यात्रा सुरू करण्यात यावी, यात्रा परिसरात व्यावसायिकांना दुकाने लावण्यास अनुमती देण्यात यावी, या मागणीचे निवदेन मुख्यमंत्र्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. चक्काजामची तयारीही चालविली होती. बहिरम यात्रा सुरू करण्याबाबत ३१ डिसेंबरनंतर बघू. शासनस्तरावरून नव्याने काही मार्गदर्शक सूचना आल्यास यात्रा सुरू करण्यावर विचार करु, असे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांशी बोलताना स्पष्ट केले होते.

बॉक्स

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा

यात्रा, उत्सव आयोजनाच्या अनुषंगाने शासनाचा २४ डिसेंबरचा आदेश बहिरम यात्रेकरिता प्रयत्न करणाऱ्यांकडून व्हायरल केल्या जात आहे. ‘जमलं गड्या’ म्हणत जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशाच्या प्रतीक्षेत ते आहेत. बहिरम यात्रा फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरू ठेवण्याचा मनोदयही त्यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहे. व्यावसायिक, यात्रेकरू, पर्यटक व भाविकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.