शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बहिरमचा काशी तलाव पुनर्जीवनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:17 IST

तालुक्यातील बहिरमबुवा यात्रा ही ऐतिहासिक यात्रा असून शासनाच्या दुर्लक्षतेमुळे यात्रेचे वैभव असलेल्या ऐतिहासिक काशी तलाव शेवटच्या घटका मोजत आहे.

ठळक मुद्देपात्र कोरडेच : शासन उदासीन, लोकप्रतिनिधींची डोळेझाक

आॅनलाईन लोकमतचांदूर बाजार : तालुक्यातील बहिरमबुवा यात्रा ही ऐतिहासिक यात्रा असून शासनाच्या दुर्लक्षतेमुळे यात्रेचे वैभव असलेल्या ऐतिहासिक काशी तलाव शेवटच्या घटका मोजत आहे. शासनाचा नाला खोलीकरण, शेततळे या योजनेअंतर्गत काशी तलावाचे पुनर्जीवन केल्यास इतिहासाची साक्ष देणाऱ्या तलावाचे वैभव वाचू शकते.सातपुड्याच्या कुशीत वसलेले लाखो कुटुंबांचे कुलदैवत बहिमरबुवा असून महाराष्ट्रासह परप्रांतीय भाविक या यात्रेत सहभागी होतात. भगवान शंकर व पार्वती प्रवास करीत असताना एकदा या ठिकाणी थांबले होते. त्यावेळी निसर्गाच्या कुशीतील हे ठिकाण पार्वतीला आवडले होते. त्यामुळे पार्वतीने शंकराला येथे दरवर्षी येण्याची गळ घातली. त्यावर शंकराने माझा एक अंश नेहमीसाठीच येथे ठेवतो, अशी आख्यायिका आहे. भगवान शंकराचे ‘भैरवाचे ठिकाण’ म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. पूर्वी हे तलाव भाविकांची तहाण भागवित होते. मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे याकडे दुर्लक्ष होत आहे.काशी तलावात ॠ षींचा मुक्कामसातपुडा पर्वतातून वाहणाऱ्या पावसाच्या धारा या जंगलात असणाऱ्या वनऔषधीसोबतच येथील कशी तलावात पाणी जमा व्हायचे. काशीतलावाच्या चारही बाजूला सीताफळ, चंदनाचे मोठे वन आहे. अनेक वनऔषधीसुद्धा या जंगलात आढळतात. काशी तालवासंदर्भात पुराणातही दाखला मिळतो. ॠ षी विश्वामित्र, दुर्वासा व मार्तंड यांनी येथे तीन, सात व चार दिवस मुक्काम केला होता. आज या तलावात पाणी नसले तरीदेखील भाविकांच्या मनात तलावाविषयी श्रद्धा आहे.ब्रिटिशकाळात झाले संवर्धनयात्रेकरूंची तहान मागविणारा काशी तलावात आज पूर्णत: कोरडा पडला आहे. इंग्रजांना या तलावाचे महत्त्व पटल्याने ब्रिटिशकाळात या तलावाचे संवर्धन करण्यात आले. मात्र, इतिहासाची साक्ष असलेला हा काशी तलाव आजही उपेक्षितच आहे. चांदूर बाजारचे तत्कालीन गटविकास अधिकारी तुकाराम टेकाडे यांनी काशी तलावाला पुनर्जीवन देण्याचा निर्धार केला होता. या ठिकाणी पर्यटनाच्या हेतुने बोटिंग, मासेमारीसारखे अनेक उद्योग चांगल्या तºहेने सुरू करता येत असल्याची कल्पना मांडली होती.जिल्हा परिषदेने या ऐतिहासिक काशीतलावात नियोजनबद्ध सुशोभीकरण केल्यास निसर्गाच्या सानिध्यातील हा काशी तलाव मोठे पर्यटनस्थळ बनू शकतो. याकरिता लवकरच शासनस्तरावर मागणी करणार आहे.- नितीन टाकरखेडे, उपसभापती, पंचायत समिती