शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरा रेल्वे स्थानकावरील लगेज स्कॅनर झाले जुगार अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:08 IST

अतिरेकी कारवायांपासून बचाव आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बडनेरा रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेले लगेज स्कॅनरच आता असुरक्षित आहे. बाहेरील व्यक्तींनी त्याचा ताबा मिळविला आहे. जुगार खेळणे आणि सिगारेटचे झुरके ओढण्यासाठी त्याचा वापर होत आहे. या गंभीर बाबीकडे रेल्वे सुरक्षा बलाने सपशेल दुर्लक्ष केल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देबाहेरील व्यक्तींचा कब्जा : सुरक्षा बलाचे अक्षम्य दुर्लक्ष
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अतिरेकी कारवायांपासून बचाव आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बडनेरा रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेले लगेज स्कॅनरच आता असुरक्षित आहे. बाहेरील व्यक्तींनी त्याचा ताबा मिळविला आहे. जुगार खेळणे आणि सिगारेटचे झुरके ओढण्यासाठी त्याचा वापर होत आहे. या गंभीर बाबीकडे रेल्वे सुरक्षा बलाने सपशेल दुर्लक्ष केल्याचे वास्तव आहे.बडनेरा रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारालगत प्रवाशांकडील संशयास्पद साहित्याची तपासणी करण्यासाठी लगेज स्कॅनर लावण्यात आले आहे. ये-जा करतेवेळी प्रवाशांनी सामान, साहित्याची तपासणी या स्कॅनरमधूनच करावी, असे अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने रेल्वे प्रशासनाने लगेज स्कॅनर हाताळण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाकडे सोपविली आहे. तथापि, हे अतिशय महागडे लगेज स्कॅनर बेवारस स्थितीत ठेवण्याचा अफलातून प्रकार रेल्वे सुरक्षा बलाने चालविला आहे. बडनेरा रेल्वे स्थानक हे ‘अ’ दर्जाचे आहे. येथून दरदिवशी देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवासासाठी गाड्या धावतात. हजारो प्रवाशांचे अवागमन होत असूनही रेल्वे सुरक्षा बलाने २५ लाखांचे लगेज स्कॅनर बेवारस सोडणे आश्चर्यकारक मानले जात आहे. काही महिने ते व्यवस्थित हाताळण्यात आले. मात्र, आता रेल्वे सुरक्षा बलाने त्याकडे पुरते दुर्लक्ष केले आहे.केंद्र सरकार रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, लगेज स्कॅनर, मेटल डिटेक्टर, हॅन्डमेड डिटेक्टर आदी अद्यावत यंत्रसाम्रगीचा वापर करीत आहे. मात्र, हल्ली मनुष्यच नव्हे, भटकी कुत्रीही लगेज स्कॅनरच्या आश्रयाने निवांत बसत असल्याचे चित्र आहे. हे स्कॅनर बेवारस असल्याने त्यावर बाहेरील व्यक्तींनी कब्जा केला आहे. याबाबत बडनेरा रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक राजेश बढे यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाही.लगेज स्कॅनरवर खेळला जातो जुगारबडनेरा रेल्वे स्थानकावरून रात्रीचा प्रवास करणे धोकादायक ठरू शकतो. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तैनात पोलीस कर्मचारी रात्री कुठे कर्तव्यावर असतात, हा संशोधनाचा विषय आहे. तिकीट खिडकी, प्लॅटफॉर्म, पोलीस चौकशीवर रात्रीला पोलीस नसतात, तर रेल्वे साहित्याचे संरक्षण करण्याच्या नावाने गस्तीवर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे जवान कोठे कर्तव्य बजावतात, हा प्रश्नदेखील यानिमित्त उपस्थित झाला आहे. ठाणे नोंदवही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपासली, तर अनेक धक्कादायक बाबी पुढे येतील, असे सूत्रांनी सांगितले.चोरटे, खिसेकापूंचा वावरबडनेरा रेल्वे स्थानकावर चोरटे, खिसेकापूंचा वावर वाढला आहे. लगेज स्कॅनरवर बसून जुगार खेळण्यापर्यंत काहींनी मजल गाठली आहे. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत असताना, प्रवासी कितपत सुरक्षित, हा प्रश्नच आहे.