वर्धा नदीला पूर : दोन दिवस राहणार पाण्याचा विसर्गधामणगाव रेल्वे : बगाजी सागर धरणात जलसाठा वाढल्यामुळे धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले़ वर्धा नदीला पूर आला असून दोन दिवस पाण्याचा विसर्ग सुरूच राहणार आहे़ अमरावती आणि वर्धा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर बगाजी सागर धरण आहे. हे पाणी उन्हाळ्यात अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या गावांसाठी संजीवनी ठरते. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे़ त्यामुळे १५४ घनमिटर प्रतीसेकंद नुसार पाण्याचा विर्सग सुरू आहे़ धरणाचे अकरा दरवाजे २० सेंमीपर्यंत उघडल्याने वर्धा नदीला पूर आला आहे़ वर्धा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे़ दोन दिवस पाण्याचा विर्सग सुरू राहील, अशी माहिती निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डी़जी़ रब्बेवार यांनी दिली़
बगाजी सागरचे ११ दरवाजे उघडले
By admin | Updated: July 5, 2016 23:58 IST