शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरा रेल्वे वॅगन दुरूस्तीच्या कामाला प्रारंभ

By admin | Updated: May 5, 2017 00:21 IST

बडनेरा रेल्वे वॅगन रिपेरिंग वर्कशॉप प्रोजेक्टच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून या कामाची प्रत्यक्ष पाहणी

 वास्तूनिर्मितीचा आढावा : मुहूर्त साधला, ३१६ कोटींचा प्रकल्प अमरावती : बडनेरा रेल्वे वॅगन रिपेरिंग वर्कशॉप प्रोजेक्टच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून या कामाची प्रत्यक्ष पाहणी खा. आनंदराव अडसूळ यांनी केली. वर्कशॉप प्रोजेक्ट इंजिनिअर व कामगारांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून प्रकल्पाच्या वास्तुनिर्मितीचा आढावा घेण्यात आला. सुमारे २०१०-११ च्या रेल्वे बजेटमध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी घोषित केलेल्या २४७.५७ कोटी रुपयांच्या वॅगन रिपेरिंग फॅक्टरी प्रोजेक्टचा कंत्राटदारांच्या न्यायालयीन वादविवादामुळे रखडला होता. या वादविवादावर मार्ग काढून सुधारित अंदाजपत्रक रेल्वे मंत्रालयास खा. आनंदराव अडसूळ यांनी सादर करून ३१६.१० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळवून घेतली व त्यानंतर झालेल्या निविदा प्रक्रियेअंती कलकत्ता (पश्चिम बंगाल) व गुजरात येथील वापी येथील कंत्राटदारांची निविदा मंजूर झाल्यामुळे सदर कामास वेग देण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष कामास सुरूवात करावी, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ यांनी केली व आज रोजी सदर कामास १९२.४७ एकरावर प्रकल्प उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. सदरील व्हॅगन फॅक्टरीच्या स्थळाला प्रत्यक्ष भेट देवून वळविण्यात येणाऱ्या काटआमला रस्त्याची पाहणी तसेच उभारण्यात येणाऱ्या वर्कशेड स्थळाची पाहणी व नकाशाद्वारे प्रकल्प उभारणीचा आराखडा खा. अडसूळ यांनी समजून घेतला. यावेळी पटणा बिहार येथून वर्कशॉप प्रोजेक्ट डिव्हीजनच्या अभियंत्याची भेट घेवून दीड वर्षात प्रकल्प पूर्ण होईल.