चार दिवसात दुसरी घटना : संतप्त जमावाची दगडफेक, ट्रक जाळण्याचा प्रयत्नपरतवाडा : परतवाडा येथून भरधाव वेगाने अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला आठवडी बाजारानजिक बुधवारी दुपारी ३ वजता धडक दिली. यात घटनास्थळीच महिलेस चिरडल्याने मृत पावली. संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करुन काचा फोडल्या व जाळ्ण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी लगेच पोलीस पोहचल्याने अनर्थ टळला. मागील चार दिवसात ३०० मीटर अंतरावर ही दुसरी घटना घडली. बेबीताई मुकुंदराव धाकडे (४५) रा. नारायणपूर असे मृत महिलेचे नाव आहे. मुलगा कपिल सोबत बेबीताई बॅँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. दोघेही दुचाकीने घरी जात असतांना परतवाडा-अमरावती महामार्गावरील आठवडी बाजारनजीक मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच०४-एच ५९४१ या ट्रकने मागून जोरदार धडक दिली. यात बेबीताई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जमावाची दगडफेक अपघात इतका भीषण होता की बेबीताई धाकडे यांचा मृतदेह पोलिसांनी उचलल्यानंतर शरीराच्या काही अवयाचे मांस रस्त्यावर २५ फुटापर्यंत उडाले होते. रक्ताचा सडा पडला होता. मांसाचे बारीक तुकडे उचलून माती टाकण्यात आली. अपघात होताच घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.गतिरोधक नसल्याने अपघात जयस्तंभ ते बाजार समितीपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरु असून रस्त्यावरच कुठेच गतिरोधक नाही. परिणामी वाहने वेगाने धावतात. अपघात होऊन निष्पाप बळी जात आहे. वृत्त लिहेस्तोवर पोलिसात फिर्याद दाखल न झाल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता. (प्रतिनिधी)आंबेडकर जयंतीसाठी काढले पैसे उद्या १४ एप्रिलला रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने बेबीताई धाकडे मुलगा कपीलसोबत बॅँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. उत्साहात सण साजरा करण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी काही रक्कम काढून त्या मुलासोबत घरी जात असल्याची चर्चा घटनास्थळी होती. मात्र काळाने वेळीपूर्वीच त्यांच्यावर घात केला. चार दिवसात दुसरा अपघात ९ एप्रिल रोज ३०० फुट अंतरावर जयस्तंभ चौकात भरधाव ट्रकने गवंडी काम करणाऱ्या अचलपूर मंजूरखुरा येथील मो. राजिक शे. मेहबूब (२५) या मजुरास चिरडले होते. त्यानंतर चार दिवसांनंतर बुधवारी सलग दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
परतवाड्यात भरधाव ट्रकने महिलेस चिरडले
By admin | Updated: April 14, 2016 00:08 IST