शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
3
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
4
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
5
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
6
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
7
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
8
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
9
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
10
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
11
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
12
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
14
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
15
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
16
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
17
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
18
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
19
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
20
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

-तर बबलू शेखावतांनी आरोपांचे खंडण करावे

By admin | Updated: August 13, 2016 23:54 IST

काँगेसच्या काही नगरसेवकांनी महापालिकेत दुकानदारी थाटली आहे.

रावसाहेबांचे आव्हान : बाळगलेले मौन संशयाला बळ देणारेअमरावती : काँगेसच्या काही नगरसेवकांनी महापालिकेत दुकानदारी थाटली आहे. गोल्डन गँगचा उतमाज सुरू आहे. शहर काँग्रेसचे आम्हीच कर्तेधर्ते, अशी आवई उठविल्या जात आहे. अशा विपरीत परिस्थितीत सभागृह नेत्याने ेमाध्यमांसमोर येऊन आरोपांचे खंडण करायला हवे, असा वडिलकीचा सल्ला माजी आ. रावसाहेब शेखावत यांनी बबलू शेखावत यांना दिला आहे. शनिवारी रावसाहेबांनी 'लोकमत'शी दिलखुलास गप्पा केल्या. त्यात त्यांनी विविध विषयांवर रोखठोक मते मांडली. ज्यांची २० ते २५ लाख रुपये खर्च करण्याची तयारी आहे, त्यालाच आम्ही महापालिकेची उमेदवारी देऊ, असा विखारी प्रचार काँगेसच्या काही नगरसेवकांनी चालविल्याचा आरोप त्यांनी केला. संजय अकर्ते, बबलू शेखावत यांच्या तुलनेत विश्वासराव देशमुखच शहराध्यक्षपदासाठी सुयोग्य आहेत. महापालिका निवडणुकीचे आव्हान पेलायचे असेल तर शहर काँग्रेसला विश्वासरावांशिवाय पर्याय नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. गोल्डन गँगमध्ये बबलू शेखावतांचाही समावेश असेल, अशी शंका घेण्यास आता पुरेसा वाव आहे. महापालिकेत अलीकडे झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे गटनेते म्हणून बबलू शेखावत यांनी खंडण करणे अभिप्रेत असताना त्यांनी बाळगलेले मौन संशयाला वाव देणारे ठरले आहे. ते साधे नगरसेवक असताना त्यांना दोनदा स्थायी समितीचे सभापती केले.सभागृहात ज्येष्ठ नगरसेवक असताना त्यांना गटनेतेपदाची जबाबदारी दिली. मात्र बबलू यांनी त्या पदाचा दरुपयोगच केला. त्यांच्यावर एवढी मोठी जबाबदारी दिल्याची आज आपल्याला खंत वाटत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. दरम्यान खोडके यांच्या मागे किती नगरसेवक आहेत. त्यातील किती जण राष्ट्रवादीमध्ये परत जातील हे महापालिका निवडणुकीच्या एक दीड महिन्यांपूर्वी स्पष्ट होईल. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस फ्रन्टमधून काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची व त्यांच्या उमेदवारीची संख्या ठरणार आहे. खोडकेंचे नेतृत्व मानणारे नगरसेवक पूर्णपणे काँग्रेसमध्ये येत असतील तर राष्ट्रवादी संपली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महापालिका निवडणुकीत कोण उमेदवार असावेत, हे आम्ही किंवा निवडक नगरसेवक ठरविणार नसून स्टेट पार्लमेन्टरी बोर्ड ठरवीत असल्याचे ते म्हणाले. मी गप्प बसलेलो नाही. आता बाहेर पडण्याची योग्य वेळ आली आहे. विश्वासरावांनीच मला 'लॉन्च' केले होते. ते मला मोठ्या भावासारखे आहेत. महापालिका निवडणूक जिंकायची असेल तर गोल्डन गँगमधील सदस्यांच्या सहभागाने नव्हे, तर खमक्या नेतृत्वाने लढावे लागेल आणि त्यासाठीच विश्वासरावांचे नाव आपण अग्रक्रमाने प्रदेश काँग्रेससमोर ठेवल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)का हवेत विश्वासराव ?आगामी महापालिका निवडणूक काँग्रेससाठी सोपी नाही. आम्ही सत्तेपासून दूर आहोत. आव्हान खूप मोठे आहे. या निवडणुकीला आक्रमकरीत्या सामोरे जावे लागेल. त्यासाठी शहर काँग्रेसला खमके नेतृत्व हवे आहे. या खमक्या नेतृत्वासाठी विश्वासराव १०० टक्के 'राईट चॉईस' आहेत.नेतृत्वासाठी दमदार माणूस हवा आणि त्यासाठीच प्रदेश काँग्रेसकडे विश्वासराव देशमुखांच्या नावाचा भक्कमपणे आम्ही पाठपुरावा चालविला असल्याचा दावा रावसाहेब शेखावतांनी केला. अवघ्या तीन नगरसेवकांच्या भरवशावर त्यांनी २००९ च्या विधानसभेत मला विजयी करवून दाखवले. माझ्या विजयाचे कप्तान ते होते. २०१४ साली २७ नगरसेवक असतानाही माझा पराभव झाला. त्यामुळे कुणी काय केले, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असेही रावसाहेब म्हणाले.म्हणून काँग्रेस माघारलीअकर्ते अध्यक्ष असताना बबलू शेखावतांनी स्वत: अध्यक्ष होण्यासाठी गुपचूपपणे चार महिने मोहीम चालविली. महापालिकेतून या कारभाराची सूत्रे हलविण्यात आली. अकर्तेंनीही मौन धारण केले. त्यामुळे शहर काँग्रेस विक झाल्याचा आरोप त्यांनी केला. तडजोडीचा अर्थ गद्दारी असेल तर कुणी मला तडजोड शिकवू नये, काँग्रेसमधील काही नगरसेवकांनी महापालिकेत दुकान मांडल्याचा घणाघात त्यांनी केला. कुणाच्याही कामात हस्तक्षेप करणे मला आवडत नाही. कदाचित तो माझा 'ड्रा बॅक' असावा, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्हीच महापालिकेच्या तिकिटा वाटणार आहोत, अशी आवई काही नगरसेवकांनी उठविली आहे. हे पक्षासाठी घातक असून पक्षाला खुजे करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.का नक ोत बबलू शेखावत ?बबलू शेखावत आणि संजय अकर्ते यांना माझा वैयक्तिक विरोध नाही. अकर्तेंना तर मीच शहराध्यक्ष केले होते. बबलू शेखावतांना काँग्रेसचे शहराध्यक्ष केल्यास माझ्यावर घराणेशाहीचा आरोप होईल. त्यांनी मौन धारण केल्याने त्यांच्याबद्दल संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. प्रचारक म्हणून माजी आमदारही शेखावत आणि शहराध्यक्षही शेखावतच, समाजात आणि कार्यकर्त्यात चुकीचा संदेश जाईल. त्याचा दुष्परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील. आगामी निवडणुका पाहता ते काँग्रेसला परवडणारे नाही. दरम्यान काँग्रेसचेच काय तर अन्य पक्षांचे नगरसेवकही आपल्यासोबत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.