शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

विद्यापीठात पुरस्कार सोहळा

By admin | Updated: December 22, 2016 00:38 IST

शिक्षणाबरोबरच सामाजिक वातावरण निर्माण कणे हे विद्यापीठाचे दायित्व आहे. समाजासाठी आयुष्य झोकून काम करणाऱ्या ...

कुलगुरुंच्या हस्ते वितरण : हेमंतकुमार भालेराव यांना सामाजिक पुरस्कार प्रदान अमरावती : शिक्षणाबरोबरच सामाजिक वातावरण निर्माण कणे हे विद्यापीठाचे दायित्व आहे. समाजासाठी आयुष्य झोकून काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्यापासून समाजाला प्रेरणा मिळावी म्हणून या पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ करत असून अशा कार्यक्रमांमधून सामाजिक चळवळ उभी व्हायला हवी, असे प्रतिपादन कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी केले. अमरावती विद्यापीठातर्फे दिल्या जाणारा कै. नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृतीप्रित्यर्थ संत गाडगेबाबा सामाजिक कार्य पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकारच्या वने, पर्यावरण व वातावरण मंत्रालयाचे माजी उच्चस्तरीय सल्लागार समिती सदस्य चेतराम पवार, कुलसचिव अजय देशमुख, बीसीयूडीचे संचालक राजेश जयपुरकर, भय्यासाहेब मेटकर, प्राचार्य नीलेश गावंडे, हेमंतकुमार भालेराव, दिलीप हांडे, अनिल घोम व विलास नांदूरकर व्यासपीठावर उपस्थित होते. याकार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते हेमंतकुमार भालेराव यांना संत गाडगेबाबा सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. दहा हजार रोख, सन्मानचिन्ह प्रमाणपत्र शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आला. पर्यावरणाच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा स्थित भास्करराव शिंगणे कला, नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयाला विद्याीठाचा पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राचार्य नीलेश गावंडे यांना १५ हजार रोख सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक अजय देशमुख यांनी तर पुरस्काराची भूमिका राजेश जयपूरकर यांनी मांडली. यावेळी भय्यासाहेब मेटकर, हेमंतकुमार भालेराव आणि नीलेश गावंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर तर आभार प्रदर्शन अनिल घोम यांनी केले. कार्यक्रमाला गणेश पाटील, जयकिरण तिडके, विद्यालक्ष्मी मेटकर, जयंत वडते, शशीकांत आस्वले, एम.टी. देशमुख, श्रीकांत पाटील, आर.डी. सिकची आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)