(फोटो मेलवर आहेत)
अमरावती : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने रविवारी सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हाभरातील २५०० अंगणवाडी केंद्रांमध्ये ‘उत्सव सावित्रीचा - जागर स्त्रीशक्तीचा’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रम पार पडले.
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने ही संकल्पना ठेवून १४ तालुक्यातील अंगणवाडी केंद्रामार्फत गावोगावी स्त्री शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, याकरिता दिंड्या काढण्यात आल्या. अंगणवाडी केंद्रातील, गावातील लहान मुलींना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पेहराव करून स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. याशिवाय गावात नवजात मुलींच्याचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. कोविड १९ अंतर्गत उल्लेखनीय काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी, याकरिता पोषण आहार संबंधी प्रबोधन करणारे उपक्रम अंगणवाडी केंद्रांमध्ये राबविण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) प्रशांत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना यशस्वी करण्यात आली.