शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नफ्याच्या जुळवणीत परवानगी घेणे टाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2016 00:02 IST

प्रीमियम एफएसआय घेणे परवडेल की टीडीआर हे धंद्यातील गणित जुळविण्यात मग्न असलेल्या डागांनी बांधकाम परवानगी घेण्यास टाळाटाळ केली

डागा सफायर : ३४९६.३२ चौरस मीटर बांधकाम अनधिकृत अमरावती : प्रीमियम एफएसआय घेणे परवडेल की टीडीआर हे धंद्यातील गणित जुळविण्यात मग्न असलेल्या डागांनी बांधकाम परवानगी घेण्यास टाळाटाळ केली अन एका झटक्यात त्यांच्या इमारतीचे बांधकाम अवैध ठरल्याचे आता उघड झाले आहे.मौजा कॅम्प नझूल शिट क्रमांक ३७ नझूल भूखंड क्रमांक ८/१ येथे बांधकाम परवानगी मिळण्याबाबत डागा इन्फ्राटेककडून ५ फेब्रुवारीला महापालिकेकडे अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर महापालिकेतील सहायक संचालक नगररचना कडून १८ मार्चला पत्र देण्यात आले. त्यानंतर पुन्हा २ मे रोजी डागा इन्फ्राटेककडून सहायक संचालक नगररचनाला पत्र देण्यात आले. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ अंतर्गत आपला बांधकाम परवानगीचा अर्ज नकाशासह रितसर आॅटो डीसीआर प्रणाली अंतर्गत या कार्यालयात दाखल करावा, तत्पूर्वी आपण दहा लाख रुपये अनामत रक्कम २ दिवसांत भरावी, अशी नोटीस १९ मे रोजी महापालिकेतील सहायक संचालक नगररचना विभागाकडून डागा इन्फ्राटेक प्रा.लि च्या ध्रुव डागा यांना पाठविण्यात आली. या नोटीसनुसार डागा सफायरला बांधकाम परवानगीचा अर्ज नकाशासह आॅटो डीसीआर प्रणालीअंतर्गत दाखल करावयवचा होता. मात्र त्यांनी तसा अर्ज महापालिकेतील एडीटीपीकडे दाखल केला नाही.सदर प्रकरणात डी क्लास मनपाच्या नियमावलीस अंतिम मंजुरी मिळेपर्यंत सदर नियमावलीतील तरतुदीच्या अनुषनगाने आठवा मजला अनुज्ञेय करण्यासाठी १० लाख रुपये भरावेत .त्यासाठी आॅटो डीसीआर प्रणाली अंतर्गत बांधकाम परवानगीचा अर्ज दाखल करावयवचा होता. मात्र आठव्या मजल्याचे बांधकाम प्रिमियम एफएसआय घेउन करावे की, त्यासाठी टीडीआर विकत घ्यावा, असा हिशेब करणे डागा सफायरच्या संचालकांनी सरू केले. महापालिकेच्या आॅटो डीसीआर प्रणालीअंतर्गत अर्ज दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न केल्याचा दावा डागा सफायरकडून केला जातो. मात्र त्यांना ही प्रक्रिया मॅन्यूअल पध्दतीने करणे शक्य होते. त्यादरम्यान आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची अमरावतीतून बदली झाली व आता नव्याने संपूर्ण प्रक्रिया करावी लागेल. यात पैसाही ओतावा लागेल, अशी भीती डागा सफायरला वाटू लागली.टीडीआर चढ्या दराने विकत घेण्यापेक्षा प्रस्तावित डीसी रुल्सची प्रतीक्षा करायची, असा सल्लाही त्यांना देण्यात आला. टीडीआर की प्रीमियम एफएसआय यापैकी ते कशचीही निवड करू शकले नाही आणि परवानगीचा अर्ज नकाशासह आॅटो डीसीआर प्रणालीअंतर्गत दाखल न करता त्यांनी अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले. ए,बीे आणि सी या तीन इमारतींमध्ये डागा यांनी केलेले तब्बल ३४९६.३२ चौरस मीटर बांधकाम अनधिकृत ठरविण्यात आले आहे. १५ दिवसाचीमुदत त्यानना देण्यात आली. ही मुदत १७ आौगस्टला संपुष्टात येत असून डागा सफायरचे अवैध बांधकाम ते स्वत: पाडतात की महापालिकेचा गजराज त्यावरुन फिरविला जातो,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)अवैध बांधकामावर हातोडा हवाचमहापालिका प्रशासनाला ठेंगा दाखवत तब्बल ३७ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम करणाऱ्या डागा सफायर या इमारतीवर महापालिकेने गजराज फिरवावाच, अशी अपेक्षा आता जनसामान्यांतून व्यक्त होत आहे. एखादी इमारत पाडल्यास अन्य कुणी अवैध बांधकाम करण्यास धजावणार नाही. त्यामुळे महापालिकेने हे धाडस करावे, असा सूर उमटू लागला आहे.