जितेंद्र दखने अमरावतीअमरावती : फक्त स्वत:च्या उद्धारासाठी झटणाऱ्या आणि कागदोपत्री ‘आॅलवेल’दाखविणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल २६५ दूध उत्पादक सहकारी संस्थांना टाळे लावण्यात आले. सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या दूग्ध उत्पादन विभागाने ही कारवाई केली. त्यामुळे निव्वळ दूध उत्पादक संघांच्या निवडणुकांपुरत्या उरलेल्या संस्थांना आता चाप बसणार आहे. सहकारी तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या संस्थांनी दूध संकलन करुन ते जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला पुरविणे आवश्यक होते. पण, या संस्थांनी पुढे काही कामच केले नसल्याचे समोर आले. त्यापैकी काही संस्थांची स्थापना तब्बल दहा ते बारा वर्षांपेक्षाही जुनी आहे. या संस्था केवळ शासन दरबारी फाईलींमध्येच जिवंत होत्या. नोंदणीकृत संस्थांना दरवर्षी लेखापरीक्षण अहवाल सादर करावा लागतो. पण, या २६५ संस्थांनी नियम पायदळी तुडविल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यात ४७ संस्था अवसायनातअमरावती : निर्धारित वेळेत निवडणुका घेणे, संस्थाचालकांनी बंध पत्रक, लेखापरीक्षण अहवाल, आर्थिक पत्रक संबंधित विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे. या संस्थांनी मात्र या नियमांची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. नोटीस देऊन आणि वारंवार संधी देऊनही संबंधित संचालक मंडळांनी नियमांची कोणतीच पूर्तता केली नाही. त्यामुळे नियमानुसार या संस्थावर कारवाई प्रस्तावित आहे. आतापर्यत जिल्ह्यात ४७ दूध उत्पादक संस्था अवसायनात काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुढील कारवाई करत अखेर मान्यताच रद्द करण्यात आली आहे. सध्या दुध पुरवठा करणाऱ्या २११ संख्याच कार्यान्वित आहेत.
२६५ दूध उत्पादक संस्थांना टाळे
By admin | Updated: July 12, 2014 00:39 IST