शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

७२ प्रकल्पांमध्ये सरासरी ५४ टक्केच जलसाठा

By admin | Updated: July 20, 2014 23:57 IST

पावसाच्या चार महिन्यांपैकी ५० दिवसांचा कालावधी लोटला आहे. सद्यस्थितीपर्यंत ३९० मि.मी. सरासरी पाऊस अपेक्षित असताना केवळ १७० मि.मी.ची नोंद झाली आहे. परिणामी ओव्हरफ्लो होण्याऐवजी

गजानन मोहोड - अमरावतीपावसाच्या चार महिन्यांपैकी ५० दिवसांचा कालावधी लोटला आहे. सद्यस्थितीपर्यंत ३९० मि.मी. सरासरी पाऊस अपेक्षित असताना केवळ १७० मि.मी.ची नोंद झाली आहे. परिणामी ओव्हरफ्लो होण्याऐवजी जिल्ह्यातील एक मोठा, ४ मध्यम व ६७ लघु प्रकल्पात पूर्ण संचय पातळीच्या केवळ १८.३५ दशलक्ष घनमीटर इतकाच साठा शिल्लक आहे. ही सरासरी केवळ ५४ टक्के आहे. पावसाची अशीच स्थिती राहिल्यास या प्रकल्पातून रबी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळणे दुरापास्त होईल. प्रकल्पांमधील जलसाठा फक्त पाणीपुरवठा योजनांसाठीच मर्यादित करावा लागेल. खंडित पावसामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या रबी हंगामासाठी ही धोक्याची घंटा आहे. ऊर्ध्व वर्धा प्रकल्प हा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्यानंतर शहानूर, सपन, चंद्रभागा व पूर्णा हे चार मध्यम प्रकल्प आणि ६२ लघु प्रकल्प आहेत. यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने या लघु प्रकल्पातील जलाशयाची पातळी कमालीची घटली आहे. ८७३.२५ दशलक्ष घनमीटर इतक्या उपयुक्त साठ्याची गरज असताना केवळ १५४.६९ दशलक्ष घनमीटर साठा तूर्तास शिल्लक आहे.