शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सायंस्कोरमध्ये आॅटोचे पार्किंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2016 01:00 IST

जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सायन्सकोर मैदानात अनेक दिवसांपासून आॅटोची अवैध पार्किंग करण्यात येत आहे.

‘पाल’ थाटली : वॉलकंपाऊंड फोडले, मैदानाला अतिक्रमणाचा विळखाअमरावती : जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सायन्सकोर मैदानात अनेक दिवसांपासून आॅटोची अवैध पार्किंग करण्यात येत आहे. या मैदानाचा अतिक्रमणाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. विशेष म्हणजे सायन्सकोर मैदानाची कुंपण भिंत तोडण्यात आली आहे. त्या परिसरात रोज १० ते १५ आॅटो पार्क केले जात आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या सायंस्कोर मैदानात जिल्हा परिषदेची विख्यात लालशाळा व त्यापुढे खेळाचे मैदान आहे. प्रचंड आवाका असलेल्या या मैदानाला जिल्हा परिषदेने कुंपण भींत बांधली आहे. मात्र काही असामाजिक तत्वांनी या भीतीला मोठमोठी भगदाड पाडली आहेत. बसस्थानकाच्या समोर असलेल्या भींताला मोठे भगदाड पाडल्यानंतर मैदानाच्या आत आॅटोची पार्किंग सजविली गेली आहे. काही दिवसांपासून येथे आॅटोची गर्दी होत असून येथे दिवसभर आॅटो पार्क केली जाते. तेथूनच प्रवाशांची ने-आण केली जाते. याबाबत जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग अनभिज्ञ आहे. सायंस्कोर मैदानात होत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या आयोजकांना विशिष्ट शुल्क आकारले जाते. तथापि या मैदानाच्या सुरक्षेकरिता सुरक्षा रक्षक नेमले जात नाही. सुरक्षा रक्षकाविना सायन्सकोर मैदानाची सुरक्षा धोक्यात आली आहे. कुणीही हटकण्यास येत नसल्याने येथे आॅटोचालकांनी पार्किंग थाटली असताना दोन दिवसांपासून काहींनी या मैदानाच्या रुक्मिणीनगरच्या बाजूने असलेल्या भागात ‘पाल’ बनविले आहेत. आॅटो पार्किंगसह ‘पाला’चे अतिक्रमण झाल्याने अजून नव्याने अन्य अतिक्रमणधारक थिरण्याची भीती व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)