शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीत ‘नापास’ प्रचारात ‘प्रामाणिक’

By admin | Updated: October 13, 2014 23:16 IST

'चूल आणि मूल' या जोखडातून बाहेर पडत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा राजकारणातील या खालच्या स्तरावर लावला आहे.

अमरावती : 'चूल आणि मूल' या जोखडातून बाहेर पडत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा राजकारणातील या खालच्या स्तरावर लावला आहे. मात्र, यापुढील विधानसभा आणि लोकसभा या वरच्या आणि महत्त्वाच्या स्तरावर झेप घेऊ पाहणाऱ्या महिलांना मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच अडकून ठेवले आहे. आपल्या समाजातील पुरूषी मनोवृत्ती अद्यापही संपली नसल्याचेच हे द्योतक आहे. राजकीय पक्ष निवडणुकीत उमेदवारीसाठी नापास ठरविणाऱ्या महिलांना प्रत्यक्ष प्रचारात मात्र खात्रीचे प्रचारक म्हणून वावरताना दिसत आहे. राजकारणाचा पाया असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गाव आणि तालुका पातळीवर सर्व अडचणींना समर्थपणे तोंड देत महिलांनी राजकारण आणि विकासाची सांगड घालत अत्यंत उत्तम कामगिरी बजावली आहे. या कामगिरीच्या बळावर राजकारणात त्यांनी आपले पाय चांगलेच रोवले आहेत. परंतु त्यांच्या वाटा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेपर्यंत अडकविले गेले आहेत. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभेतील महिलांचा टक्का वाढायला तयार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण देऊन त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना सुरूंग लावत कायदे बनविले जाणाऱ्या या दोन्ही सभागृहांपासून महिलांना दूर ठेवण्याचा कुटील डाव पुरूषी महत्त्वाकांक्षेकडून खेळला जात आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत नशीब आजमाविणाऱ्या एकूण १३५ उमेदवारांमध्ये १४ महिलांनाच निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्यात आले आहे. त्यापैकी केवळ सात महिलांनाच राजकीय पक्षांची उमेदवारी लाभली आहे. यावरून राजकीय पक्षांमधील महिलांविषयीची कमालीची उदासीनता दिसून येत असल्याचे सिद्ध होते. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात प्रत्यक्ष उमेदवार म्हणून महिलांना उतरविण्यात राजकीय पक्षांचा हवा तेवढा कल नसल्याचे दिसून येते. महिला मतदारांवर डोळा ठेवून प्रचारात मात्र त्यांना आवर्जून गोवले जात आहे. त्यामागेही आकड्यांचे गणित आहे. जिल्ह्यात एकूण साधारणपणे २२ लाख २१ हजार ६२४ मतदार आहेत. यामध्ये महिला १० लाखांच्या वर तर पुरुषांची आकडेवारी ११ लाखांच्या वर आहे. हे लक्षात घेऊन राजकीय व्यूहरचना ठरविण्यात येते. महिलांची उमेदवारी जरी कमी असली तरी महिला मतदारसंख्या पाहता त्यांना प्रचारात सन्मान मिळाले. (प्रतिनिधी)