शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सौरदिव्यावरून सभागृह तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:11 IST

जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायत हद्दीत सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या आर्थिक वर्षात विविध योजनांतून सौरदिवे बसविण्यात आले. त्याची पंचायत समिती स्तरावरून दिलेली माहिती गोलमाल असल्याने बुधवारी जि.प. स्थायी समितीत वातावरण तापले होते.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सुनावले खडे बोल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायत हद्दीत सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या आर्थिक वर्षात विविध योजनांतून सौरदिवे बसविण्यात आले. त्याची पंचायत समिती स्तरावरून दिलेली माहिती गोलमाल असल्याने बुधवारी जि.प. स्थायी समितीत वातावरण तापले होते. या विषयावर आरोग्य व वित्त सभापती बळवंत वानखडे यांनी सभेत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीत वित्त आयोग, पेसा, समाजकल्याण, पर्यावरण संतुलित अशा विविध योजनांतून गावागावांत सौरदिवे लावण्यात आले. यापोटी लाखोंचा खर्च झाला. दोन वर्षात किती ठिकाणी सौरदिवे लावले, त्यांची सद्यस्थिती काय, असा प्रश्न सभापती बळवंत वानखडे यांनी प्रशासनाला विचारला. यासंदर्भात प्रशासनाने स्थायी समितीत माहिती मागितली. ती माहिती योग्यरीत्या जुळत नसल्याची बाब वानखडे यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी दिशाभूल करणारी माहिती सादर केल्या प्रकरणी काही गटविकास अधिकारी व झेडपीच्या संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. हा विषय तापल्याने अखेर पिठासिन सभापती यांनी मध्यस्थी करत पुढील सभेत योग्य माहिती देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे हा विषय निवळला. यावेळी शिक्षण विभागाने रामगांव येथे केंद्रीय शाळेतील चुकीच्या कारवाईचा मुद्दा सुनील डिके यांनी मांडत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. यावेळी इतरही विभागाचे मुद्दे गाजले. सभेला झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती बळवंत वानखडे, जयंत देशमुख, वनिता पाल, सुशीला कुकडे, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, महेंद्रसिंग गैलवार, सुनील डीके, सुहासिनी ढेपे, प्रियंका दगडकर, अ‍ॅडिशनल सीईओ विनय ठमके, डेप्युटी सीईओ नारायण सानप, दिलीप मानकर, कैलास घोडके, कार्यकारी अभियंता राजेंद्र डोंगरे, प्रमोद तलवारे, संजय येवले, कॅफो रवींद्र येवले उपस्थित होते.सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपलीविरोधकांची विकासकामे त्वरित होतात. मग सत्ताधाऱ्यांची का नाही. यावरून स्थायी समितीत सत्ताधारी व विरोधकांत चांगली जुंपली. विरोधकांना निधी द्यायचा नाही, नियमानुसार कामे मार्गी लावली तर त्यातही आडकाठी आणत राजकारण होत असल्याचा रवींद्र मुंदे यांनी केला. २५-१५ या लेखाशिर्षाखाली १ कोटी ९० लाखांचा निधी मुंदे यांनी आणला. या कामांचे सोपस्कारही पूर्ण केले. मग एकाच सदस्यांची कामे कशी होतात, असा प्रश्न सदस्य प्रियंका दगडकर यांनी उपस्थित केला. परंतु पदाधिकाऱ्यांच्या मंजूर कामांवर कुठलीच कारवाई होत नसल्याने अध्यक्षांनी यावर आक्षेप घेतल्याने हा वाद उदभवला.