शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दसरा मैदानाचे लक्षवेधक सौंदर्यीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:13 IST

शहरातील दसरा मैदानाच्या लक्षवेधक सौंदर्यीकरणासह साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांच्या स्मृती जपण्याच्या प्रयत्नाने परतवाडा शहराच्या वैभवात भर पडली आहे.

ठळक मुद्देशहराच्या वैभवात भर : साहित्यिक राम शेवाळकर यांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरातील दसरा मैदानाच्या लक्षवेधक सौंदर्यीकरणासह साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांच्या स्मृती जपण्याच्या प्रयत्नाने परतवाडा शहराच्या वैभवात भर पडली आहे.शहरातील वाघामाता मंदिर परिसरालगतच्या दसरा मैदानाच्या सौंदर्यीकरण अंतर्गत प्रशस्त व आकर्षक हॉलची निर्मिती करण्यात आली आहे. या सभागृहाला प्रा. राम शेवाळकर यांचे नाव देण्यात आले आहे. यावर साहित्यिक, लेखकांची ओळख म्हणून पेनाची नीपही अंकित केली आहे. सभागृहाचे प्लास्टरिंग आणि पुढील १० ते १२ वर्षे रंग उडणार नाही अशी वैशिष्ट्यपूर्ण रंगरंगोटी केली आहे. प्रा. राम शेवाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे सभागृह उभारले असून, दसरा मैदानावरील मुख्य प्रवेशद्वारालासुद्धा राम शेवाळकर असे नाव देण्यात आले आहे. अचलपूरच्या भूमीत जन्मलेल्या राम शेवाळकरांच्या स्मृती यातून जपण्याचा प्रयत्न आहे.मैदानात लोकांना बसण्याकरिता पायऱ्यांची व्यवस्था व त्याच्या बाजूला वाहणारे पाणी आणि लॉन विकसित करण्यात आले आहे. एक खुले व्यासपीठ साकारले आहे. व्यासपीठाचा दोन्ही बाजूला वापर करता येणार असून, समोरील खुल्या जागेत लॉनवर ७०० ते ८०० लोक सहजतेने बसू शकतील. व्यासपीठाला किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराचा लूक देण्यात आला आहे.परिसरातच लहान मुलांना खेळण्याकरिता खेळणी आणि वृद्धांना बसण्याकरिता जागा विकसित करण्यात आली आहे. खुल्या जागेत व्यायामाचे साहित्य बसविण्यात आले आहेत. रावण दहनाकरिता स्वतंत्र प्लॅटफॉर्म विकसित करून मैदानाची ओळख कायम ठेवण्यात आली आहे. मॉर्निंग वॉकची सुरक्षित व्यवस्था नागरिकांसाठी या सौंदर्यीकरणातून उपलब्ध झाली आहे.आ. बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून हा परिसर विकसित केला गेला. नगरपालिकेने याकरिता दसरा मैदानाची दीड एकर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाला उपलब्ध केली. तत्कालीन कार्यकारी अभियंता वा.पा. भावे, चंद्रकांत मेहेत्रे, उपविभागीय अभियंता विजय वाठ, शाखा अभियंता गोपाल बकाले यांच्या मार्गदर्शनात अवधूत कन्स्ट्रक्शनचे अमित देशमुख यांनी हे मैदान विकसित केले. याकरिता वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत ३ कोटी ६० लाख खर्च करण्यात आले. येत्या २४ नोव्हेंंबर रोजी याचे लोकार्पण होत आहे. यावेळी शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान होणार आहे.