शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

लेकरासह ‘ती’चा रेल्वेसमोर झोकून देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:10 IST

अमरावती : वार गुरुवार. वेळ सायंकाळी ७ च्या सुमाराची. स्थळ अमरावतीस्थित रेल्वेस्थानकावरील उड्डाणपूल. ती लेकरासह रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देण्याच्या ...

अमरावती : वार गुरुवार. वेळ सायंकाळी ७ च्या सुमाराची. स्थळ अमरावतीस्थित रेल्वेस्थानकावरील उड्डाणपूल. ती लेकरासह रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देण्याच्या मानसिकतेत. ती जशी उडी घेणार, तसेच तिला तिचे लेकरू बिलगले. अजाणत्या वयातही त्याला संकटाची जाणीव झाली की काय, मात्र, ते मायला घट्ट बिलगले. त्याचवेळी वरून रेल्वेचा नजारा पाहणाऱ्यांच्याही ही बाब लक्षात आली. त्यांनी तिला आत्महत्येपासून परावृत्त केले. सुमारे अर्धा तास या कल्लोळात निघून गेला. त्या लेकराच्या रुदनाने व उपस्थितांच्या माणुसकीमुळे तिचे प्राण वाचले. त्याचे झाले असे, की गुरुवार, १ जुलै रोजी ६५ दिवसांच्या खंडानंतर अमरावती मुंबई ही ‘अंबा एक्सप्रेस’ सुटणार असल्याने अमरावती रेल्वे स्थानकांवर मोठी रेलचेल होती. अनेक दिवसांनंतर ही गाडी सुटत असल्याने बघ्यांनीदेखील गर्दी केली होती. प्रवाशांची ये-जा सुरू असताना उपस्थितांनी एकच गलका केला. ‘वाचवा, धावा, रेल्वे थांबवा, चेन ओढा, असा कल्लोळ झाला.

रेल्वे पुलावरून एक तिशीतील महिला उडी घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे लक्षात आले. त्या महिलेसोबत तिचे अदमासे ५ वर्षांचे लेकरूदेखील होते. ती उडी घेण्याच्या प्रयत्नात असताना तो तिला घट्ट बिलगला. पुलावरील लोकदेखील तिला थांबवण्याचा प्रयत्न करीत होते. गस्तीवर असलेले पोलीसदेखील पोहोचले. त्यांनी त्या महिलेची समजूत काढली. महत्प्रयासानंतर तिने उडी घेण्याचा निर्णय मागे घेतला. अन्‌ सर्वांचा जीव भांड्यात पडला.

हद्द कुणाची?

या घटनेबाबत शहर कोतवाली पोलिसांना विचारणा केली असता, त्यांनी या घटनेला दुजोरा दिला नाही. अशी कुठलीही घटना आपल्या हद्दीत घडली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तर, त्या महिलेने उडी घेतली असती, तर ते प्रकरण रेल्वे पोलिसांच्या अखत्यारित आले असते, असे रेल्वे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे हद्द कुणाची, हा प्रश्न निर्माण झाला.