शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

जीवे मारण्याचा प्रयत्न; पाच वर्षे सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:50 IST

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला जोशी (फालके) यांच्या न्यायालयाने बुधवारी हा निर्णय दिला. सुरेश भगवान नितनवरे (५२ रा.मांजरी म्हसला) असे गुन्हेगाराचे नाव आहे. ही घटना चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांजरी म्हसला ते सातरगाव मार्गावर २ ऑगस्ट २०१६ रोजी सकाळी १०.३० वाजता घडली होती.

ठळक मुद्देन्यायालयीन निर्णय : २ ऑगस्ट २०१६ रोजीची चांदूर रेल्वेतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कुऱ्हाडीने एका महिलेवर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने पाच वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला जोशी (फालके) यांच्या न्यायालयाने बुधवारी हा निर्णय दिला. सुरेश भगवान नितनवरे (५२ रा.मांजरी म्हसला) असे गुन्हेगाराचे नाव आहे. ही घटना चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांजरी म्हसला ते सातरगाव मार्गावर २ ऑगस्ट २०१६ रोजी सकाळी १०.३० वाजता घडली होती.विधी सूत्रानुसार, धम्मपाल प्रल्हाद गजभिये (३७, रा. मांजरी म्हसला) हे २ ऑगस्ट २०१६ रोजी सकाळी पत्नी सोनू (३०), मुलगा व मुलीसह दुचाकीने मांजरी म्हसला ते सातरगाव मार्गावरील शेतात जात होते. त्यांना सुरेश नितनवरे नामक इसमाने रस्त्यात अडविले. पूर्ववैमनस्यातून सुरेशने धम्मपालवर कुºहाने हल्ला चढविला. त्याने चुकविलेला वार दुचाकीवर मागे बसलेल्या पत्नी सोनू यांच्या डोक्यावर बसला. त्या गंभीर जखमी होऊन खाली कोसळल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलीसांनी आरोपी सुरेशविरुद्ध भादंविचे कलम ३०७, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. तपास पूर्ण करून पोलिसांनी २७ ऑक्टोबर २०१६ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला जोशी (फालके) यांच्या न्यायालयात सहायक सरकारी अभियोक्ता मंगेश भागवत यांनी आठ साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर आरोपीचा दोष सिद्ध झाला. न्यायालयाने सुरेश नितनवरेला पाच वर्षांचा सश्रम कारावास, १० हजारांचा दंड व दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी