शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

अंबाडा येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:01 IST

अंबाडा येथील वासनकर कॉम्प्लेक्समध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. रविवारी रात्री दोन वाजता दरम्यान अज्ञाताने एटीएममध्ये प्रवेश केल्याची माहिती हैदराबाद येथील विजलंस टीम ऑफिसच्या माध्यमातून अंबाडा येथील सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक विवेकानंद साबळे यांना मिळाली.

ठळक मुद्देआरोपी जेरबंद : नागरिक, पोलिसांची सजगता

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : तालुक्यातील अंबाडा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शाखा व्यवस्थापक, पोलीस व स्थानिकांच्या सजगतेने तो प्रयत्न फसला. चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला काही तासांत अटक करण्यात आली. रविवारी रात्री दीड ते दोनच्या ही घटना उघड झाली.अंबाडा येथील वासनकर कॉम्प्लेक्समध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. रविवारी रात्री दोन वाजता दरम्यान अज्ञाताने एटीएममध्ये प्रवेश केल्याची माहिती हैदराबाद येथील विजलंस टीम ऑफिसच्या माध्यमातून अंबाडा येथील सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक विवेकानंद साबळे यांना मिळाली. एटीएममधील सीसीटीव्ही यंत्रणा बंद करण्याचा तो प्रयत्न करीत असल्याची माहिती साबळे यांनी तत्काळ मोर्शीचे ठाणेदार संजय सोळंके यांना दिली. पोलीस पथक तत्काळ अंबाड्यात पोहचले. नागरिक गोळा होईपर्यंत सदर चोर चार फुटाचा सब्बल घटनास्थळी टाकून पळून गेला. सीसीटीव्ही कॅमेरात तो कैद झाला. त्याआधारे मोर्शी पोलिसांनी संशयित म्हणून संगम दीपक मोहोड (रा.अंबाडा) याला अटक केली. सोमवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

टॅग्स :atmएटीएम