शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शिदोडीत वासरावर हल्ला अंजनसिंगी भागात वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:38 IST

मंगरूळ दस्तगीर येथे शेतकरी आणि म्हशीची शिकार करणाऱ्या नरभक्षक वाघाने रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास शिदोडी येथे गाईच्या वासरावर हल्ला केला, तर आगेकूच करीत अंजनसिंगी भागात धुमाकूळ घालीत दोन गाई फस्त केल्या. या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तीन ड्रोन कॉमेरे व चार पिंजरे लावले आहेत.

ठळक मुद्देशाळांना दिली सुट्टीतीन पिंजऱ्यांत बांधल्या म्हशी

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : मंगरूळ दस्तगीर येथे शेतकरी आणि म्हशीची शिकार करणाऱ्या नरभक्षक वाघाने रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास शिदोडी येथे गाईच्या वासरावर हल्ला केला, तर आगेकूच करीत अंजनसिंगी भागात धुमाकूळ घालीत दोन गाई फस्त केल्या. या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तीन ड्रोन कॉमेरे व चार पिंजरे लावले आहेत.रविवारच्या रात्री त्या वाघाने नाकाळी जंगल सोडत रात्री शिदोडी गाव गाठले गावात खुट्याला बांधलेल्या विनोद निस्ताने यांच्या दोन वर्षाच्या जर्शी वासरावर हल्ला चढविला. वासराच्या आवाजामुळे निस्ताने यांनी बाहेरील बल्ब लावले असता वाघाने वासरावर हल्ला करून पळ काढल्याचे स्पष्टरीत्या पाहिल्याचे ते सांगतात. पशुवैधकीय अधिकारी मनोज धवणे यांनी उपचारादरम्यान बघितलेले निशाण हे वाघाच्या दाताचे असल्याचे सांगितले. पण अजूनही वन विभाग त्या वाघाला पकडण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ग्रामस्थांनी वन विभागावर ठेवला.चिरोडी-पोहरा वर्तुळात अलर्ट जारीपोहरा बंदी : तीन दिवसांपासून धुमाकूळ घालत असलेल्या त्या नरभक्षी वाघापासून सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी, पोहरा वर्तुळातील नागरिकांना अलर्ट राहण्याची घोषणा वनविभागातर्फे करण्यात आली आहे. या परिसराकडे तो वाघ कूच करू शकतो, अशी शक्यता वडाळी वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भूंबर यांनी वर्तविली आहे.अंजनसिंगी, कुऱ्हा परिसरात शाळेला सुट्टीअंजनसिंगी येथील शेतकरी प्रकाश जुगलकिशोर अग्रवाल व शंकर भोयर शेतात आले असता त्यांना वाघ दिसला भीतीपोटी दोघानी मोटर सायकलने दूम ठोकली. या परिसरात पगमार्क आढळले. सकाळी ९.३० वाजता येथीलच मदर टेरेसा इंग्लिश शाळेच्या आवारात शिरण्याचा प्रयत्न त्या वाघाने केला. मात्र, अनेकजन ओरडल्याने तो जंगल परिसरात निघून गेला. खबरदारी म्हणून एसडीओंच्या निर्देशानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी कुऱ्हा, अंजनसिंगी, दुर्गवाडा, आखतवाडा, मारडा, शिदवाडी, बोर्डा, धारवाडा, हसनापूर, मिर्चापूर, कौंडण्यपूर येथील शाळांना २३ आॅक्टोबरची सुटी जाहीर केली.चार पिंजऱ्यांमध्ये अडकविली शिकारमागील चार दिवसांपासून या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी तैनात केलेल्या ७० बंदूकधारी वनकर्मचाऱ्यांनी आपला मोर्चा अंजनसिंगी- पिंपळखुटा जंगल क्षेत्राकडे वळविला. या भागात चार पिंजरे व तीन ड्रोन कॉमेरा लावण्यात आले आहे. चारही पिंजऱ्यांत म्हैस बांधल्याची माहिती सहाय्यक उपवनसंरक्षक अशोक कविटकर व वनपाल क्षेत्राधिकारी आशिष कोकाटे यांनी दिली.