शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दोन पोलीस कर्मचारी अधीक्षक कार्यालयाला संलग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:32 IST

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या झाडाझडतीत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील धीरज पाटणकर व शिवचरण बडगे या दोन कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आढळल्याने त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयाला संलग्न करण्यात आले, तर एसडीपीओ सुनील जायभाये यांची भोकरदन येथे बदली झाल्याचे वृत्त आले आहे. या घडामोडींना १४ जून रोजी झालेल्या एसीबीच्या कारवाईची किनार आहे.

ठळक मुद्देएसपींचे आदेश : एसडीपीओ सुनील जायभाये यांची बदली

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या झाडाझडतीत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील धीरज पाटणकर व शिवचरण बडगे या दोन कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आढळल्याने त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयाला संलग्न करण्यात आले, तर एसडीपीओ सुनील जायभाये यांची भोकरदन येथे बदली झाल्याचे वृत्त आले आहे. या घडामोडींना १४ जून रोजी झालेल्या एसीबीच्या कारवाईची किनार आहे.लाचलुचपतप्रकरणी अंजनगाव सुर्जी एसडीपीओ कार्यालयातील दोन आरटीपीसी २७ आॅक्टोबर २०१७ व १४ जून २०१८ रोजी गजाआड गेले. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी कार्यालयाची झाडाझडती घेतली. धीरज पाटणकर, शिवचरण बडगे हे कामात कसूर करीत असल्याचे निदर्शनास येताच अविनाश कुमार यांनी त्यांना तात्काळ ग्रामीण पोलीस मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश दिले.दरम्यान, आरटीपीसी सचिन भोसले याला एसीबीने ताब्यात घेतल्यानंतर एसडीपीओ सुनील जायभाये यांनी लगबगीने जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात वरिष्ठ पातळीवरून बदली करून घेतल्याची चर्चा पोलीस विभागात रंगत आहे. याप्रकरणी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केल्याचे लाचखोर सचिन भोसलेने बयानात म्हटले आहे.चारित्र्य पडताळणीसाठीही पैशांची मागणीअंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात पासपोर्टकरिता आवश्यक चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी पेसै मागितल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक, पासपोर्ट कार्यालय, एसीबी यांच्याकडे निमखेड बाजार येथील एका तरुणाने केली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने २५०० रुपये मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे.