शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘फातिमा’च्या शिक्षकाविरूध्द अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By admin | Updated: January 14, 2015 23:01 IST

क्षुल्लक कारणावरुन आदिवासी विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या व त्याच्या आईला धक्काबुक्की जातीवाचक शिवीगाळ करणारा फातिमा कॉन्व्हेंटचा शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांवर पंधरा दिवसांनंतर

तपास सुरू : विद्यार्थ्याला मारहाण केल्याचे प्रकरण अचलपूर : क्षुल्लक कारणावरुन आदिवासी विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या व त्याच्या आईला धक्काबुक्की जातीवाचक शिवीगाळ करणारा फातिमा कॉन्व्हेंटचा शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांवर पंधरा दिवसांनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपासात दोषी आढळल्यास सदर व्यक्तींना अटक करण्यात येणार आहे. याप्रकरणी काही आदिवासी संघटनाही न्याय मिळवून देण्यासाठी सरसावल्या होत्या. याप्रकरणी विद्यार्थी व त्याच्या आईने परतवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तेथे शिक्षक व कर्मचारी दोघांच्या बाजू ऐकून पोलिसांनी हे प्रकरण तपासात ठेवले होते. पोलीस नायक असलेल्या आईने आयुक्त, गृहमंत्री आदी वरिष्ठांना तक्रार अर्ज दिल्यानंतर परतवाडा पोलिसात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फातिमा कॉन्व्हेंटचा इयत्ता १० वीचा विद्यार्थी कृणाल महादेवराव कास्देकर याला २३ डिसेंबर रोजी शिक्षकाने मारले होते. याचा जाब विचारायला गेलेल्या आईलासुद्धा अपमानास्पद वागणूक देण्यात आली. याची तक्रार सरमसपुरा ठाण्यात पोलीस नायक असलेल्या आई सुमेरी महादेव कास्देकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठविली. 'मी अचलपूर येथील सरमसपुरा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना मला फोन आला की, तुमच्या मुलाला शिक्षक आशिष सुरदे हे मारहाण करीत आहे. मी शाळेत गेली असता काही मुले व शिक्षिका कृणालचे सांत्वन करीत होते. याप्रकरणाची विचारपूस केली असता तेथील सिस्टर, शिक्षकांनी माझ्याशी हुज्जत घातली. धक्काबुक्की करीत जातीवाचक शिवीगाळ केली. सुरदे यांनी मला नग्न करुन धिंड काढण्याची धमकी देऊन माझ्या गालावर थापड लगावली. मी परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली. मात्र साहेबांनी तुम्ही येथेच थांबा त्यांना पकडून आणतो, असे सांगून दोन तास ताटकळत ठेवले. माझ्या पतींनीही एफआयआर दाखल करण्याची विनंती केली. परंतु टाळाटाळ करण्यात येत होती. अखेर माझा मुलगा कृणाल याचा तक्रारी अर्ज घेतला. त्यांची वैद्यकीय तपासणी झाली. परंतु माझ्यावर झालेल्या अन्यायाची साधी चौकशीही करण्यात आली नाही. मला योग्य न्याय द्यावा, असे तक्रार अर्जात नमूद केले आहे. या अर्जावरुन अखेर शाळेचे शिक्षक आशिष सुरदे व इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)