शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीसी’ नियुक्तीची फाईल सचिवांकडे

By admin | Updated: April 27, 2016 00:01 IST

आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्तपदी अधिकारी (एटीसी) नियुक्तीची फाईल सचिवांचा दालनात असून दोन ते तीन दिवसांत ही फाईल ओके होईल, ...

आठ महिन्यांपासून प्रतीक्षा : मेघमाळे यांची वर्णी लागण्याचे संकेतअमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्तपदी अधिकारी (एटीसी) नियुक्तीची फाईल सचिवांचा दालनात असून दोन ते तीन दिवसांत ही फाईल ओके होईल, असे संकेत आहेत. लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे यांची ‘एटीसी’पदी नियुक्ती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे आठ महिन्यांपासून ‘एटीसी’ कोण? ही प्रतीक्षा संपण्याचे चिन्हे आहेत.आदिवासी विकास विभागाने महेशकुमार मेघमाळे यांनी २२ मार्च रोजी अमरावती ‘एटीसी’ पदी प्रतिनियुक्ती केली होती. मेघमाळे हे ४ एप्रिल रोजी पदाची सूत्रेदेखील सांभाळणार होते. मात्र अचानक कोठून सुत्रे हलली हे कळले नाही. २९ मार्च रोजी पुन्हा आदिवासी विकास विभागाने नवा आदेश काढून अपर आयुक्तपदी मेघमाळे यांच्या प्रतिनियुक्तीला स्थगनादेश दिला होता. आदिवासी विकास विभाग अपर आयुक्त कार्यालयातंर्गत सात प्रकल्प कार्यालये आणि १२ जिल्ह्यांमध्ये नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ५०० कोटींपेक्षा अधिक बजेट ‘एटीसी’ कार्यालयाचे आहे. मात्र गत आठ महिन्यांपासून नवीन ‘एटीसी’पदी अधिकारी नियुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे योजनांचा बोजवारा उडाला आहे. हल्ली नागपूर येथील आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त माधवी खोडे यांच्याकडे अमरावतीचा प्रभार सोपविण्यात आला आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास विभागाचे मंत्री विष्णू सावरा यांनी अमरावतीत ‘एटीसी’पदी कर्तव्यनिष्ठ अधिकारी नियुक्तीला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आदिवासी विकास मंत्रालयात सचिवांकडे सदर फाईल पाठविण्यात आली आहे. आठ महिन्यांपासूनच्या प्रतीेक्षेला याच आठवड्यात ‘एटीसी’पदी अधिकारी नियुक्ती करून शासन ‘बॅकलॉग’ भरणार असल्याचे चित्र आहे.