शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सहायक कामगार आयुक्तांनी झटकली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 05:00 IST

०० एकरांत उभा होत असलेल्या रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या कामकाजात कामगारांच्या सुरक्षेसंदर्भातील काळजी कंपनीकडून घेतली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कामगारांना सेफ्टी हेल्मेट, शूज, हॅन्ड ग्लोव्ज यांसारख्या प्राथमिक बाबींपासून त्यांच्या जीवितास धोका पोहोचू नये, अशा साधनांची येथे उणीव आहे. कामगार जोखीम पत्करून काम करीत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून संबंधित कंपनी व कंत्राटदाराने कामगारांच्या जीविताशी काही देणेघेणे नसल्याचे स्पष्ट केले. ‘

ठळक मुद्देवॅगन दुरुस्ती कारखाना, कामगारांच्या जीविताशी खेळ, रेल्वे प्रशासनाकडून कंत्राटदाराला अभय

  श्यामकांत सहस्त्रभोजने    लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : येथील वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या उभारणीत  कामगारांच्या जीविताशी खेळ होत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केले. त्यावर सदर प्रकल्प आमच्या अखत्यारीत नसल्याचे बोलून सहायक कामगार आयुक्तांनी कामगारांच्या जीविताची जबाबदारी झटकली. यामुळे आता कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांचा वाली कोण,  हा प्रश्न विकासाच्या वाटचालीतील काटे अधोरेखित करणार ठरला आहे.          २०० एकरांत उभा होत असलेल्या रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या कामकाजात कामगारांच्या सुरक्षेसंदर्भातील काळजी कंपनीकडून घेतली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कामगारांना सेफ्टी हेल्मेट, शूज, हॅन्ड ग्लोव्ज यांसारख्या प्राथमिक बाबींपासून त्यांच्या जीवितास धोका पोहोचू नये, अशा साधनांची येथे उणीव आहे. कामगार जोखीम पत्करून काम करीत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून संबंधित कंपनी व कंत्राटदाराने कामगारांच्या जीविताशी काही देणेघेणे नसल्याचे स्पष्ट केले. ‘लोकमत’ने याची दखल घेत वृत्त प्रकाशित केल्यानंतर सुरक्षेसंबंधी प्रशासकीय हालचाली गतिमान होण्याची अपेक्षा असताना, सहाय्यक कामगार आयुक्तांनी सदर प्रकल्प केंद्राचा असल्याचे सांगून जबाबदारीतून स्वत:ला वेगळे केले. या गोरगरीब कामगारांना सुरक्षा कोण देणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.  कंपनी व प्रशासनाचे असेच धोरण राहिल्यास कामगारांना नाहक दुर्घटनेला सामोरे जावे लागेल. वॅगन दुरुस्ती कारखाना उभारणीसाठी ज्या कंपनीला शासनाने नेमले, त्यांच्या कामकाजावर मात्र मोठे प्रश्नचिन्ह यातून उभा ठाकले आहे. शासनाला याची गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. कामगार संघटनांनादेखील याकडे लक्ष द्यावे लागेल. कंपनी व कंत्राटदाराला बेजबाबदारपणाबाबत दंड का केले जाऊ नये, असा सवालदेखील शहरवासीयांमध्ये आता चर्चेत आला आहे.

प्रकल्पाला गती द्या वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या उभारणीचे काम कासवगतीने सुरू आहे. ज्या कंपनीकडे सदरचे काम देण्यात आले, ती कंपनी आस्ते कदम काम करीत असल्याची ओरड शहरवासीयांमध्ये आधीचीच आहे. या वॅगन दुरुस्ती कारखान्यामुळे बऱ्याच लोकांना रोजगार मिळू शकेल. त्याची उत्सुकता बेरोजगार तरुणांना तसेच त्यांच्या पालकांना लागली आहे. यामुळे कंपनीवर नियंत्रण ठेवणाऱ्या शासन व प्रशासनानेदेखील तेवढ्याच गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे