शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’चा समारोप

By admin | Updated: June 20, 2017 00:07 IST

मागील तीन दिवसांपासून संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सुरू असलेल्या ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’चा रविवारी थाटात समारोप करण्यात आला.

उत्स्फूर्त प्रतिसाद : शेवटच्या दिवशी स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील तीन दिवसांपासून संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सुरू असलेल्या ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’चा रविवारी थाटात समारोप करण्यात आला. या शैक्षणिक प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनीत विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या वाटा निवडण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. प्रदर्शनीच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांना यूपीएससी व एमपीएसी या स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नागपूर येथील ‘द युनिक अकादमी’चे बी.बी.गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांचा बाऊ न करताना योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर विद्यार्थी ही परीक्षा सहजरीत्या उत्तीर्ण करू शकतात, असे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले. एमपीएससीमध्ये केवळ वैकल्पिक प्रश्नांवर भर दिला जातो तर यूपीएससीमध्ये वैकल्पिक व प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश असतो, असे ते म्हणाले. पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीर महाजन यांनी विद्यार्थ्यांना संकटांचा सामना करण्याची व चिकाटी टिकवून ठेवण्याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमात ‘लोकमत’चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन रवि खांडे यांनी केले. समारोपादरम्यान शैक्षणिक प्रदर्शनीत सहभागी सर्व शैक्षणिक संस्थांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. तीन दिवसांमध्ये याप्रदर्शनीला अनेक विद्यार्थ्यांनी भेटी दिल्यात व लोकमतच्या या उपक्रमाचे कौतुक केले. करिअरसंबंधी शंकासमाधान करून घेतले. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल पालकांनी व विद्यार्थ्यांनी लोकमतचे कौतुक केले.