शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी  'आसूड'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, दिव्यांग आदींच्या न्याय्य हक्कासाठी व शेतकऱ्यांच्या हिताची लढाई लढण्यासाठी ही 'आसूड' यात्रा आहे. सत्तेवर बसणाऱ्यांवर लगाम लावण्याचे काम आम्ही करीत राहणार, सत्ता हा प्रहार संघटनेचा विषय नाही, असा खणखणीत इशारा आ. बच्चू कडू यांनी तिवसा येथे आसूड यात्रेच्या जाहीर सभेत दिला.तिवसा येथील नगरपंचायत ...

ठळक मुद्देबच्चूकडू : तिवस्यात जाहीर सभा, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांतून

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, दिव्यांग आदींच्या न्याय्य हक्कासाठी व शेतकऱ्यांच्या हिताची लढाई लढण्यासाठी ही 'आसूड' यात्रा आहे. सत्तेवर बसणाऱ्यांवर लगाम लावण्याचे काम आम्ही करीत राहणार, सत्ता हा प्रहार संघटनेचा विषय नाही, असा खणखणीत इशारा आ. बच्चू कडू यांनी तिवसा येथे आसूड यात्रेच्या जाहीर सभेत दिला.तिवसा येथील नगरपंचायत चौकात आ. बच्चू कडू यांची जाहीर सभा बुधवारी सकाळी पार पडली. जाहीर सभेच्या व्यासपीठावर प्रहार जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, मनोज अंबलकर, गझलकार नितीन देशमुख, प्रमोद कुदळे, अतुल खुपते, गजू कुबडे, प्रवीण हेंडवे, मंगेश देशमुख, बल्लू जवंजाळ, तिवसा तालुकाप्रमुख गजू कडू, संघटक राज माहोरे यांच्यासह अनेक जिल्ह्यांतील प्रमुख उपस्थित होते. आसूड यात्रेला व सभेला विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून शेकडो वाहनांतून हजारो कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.आसूड सभेची भूमिका मांडताना आ.बच्चू कडू यांनी काँग्रेस व भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला. अलीकडच्या १२ वर्षांपूर्वी राज्यात काँग्रेसची सत्ता होती. त्याच सुमारास २००६ मध्ये स्वामिनाथन आयोग स्थापन झाला. मात्र, अजूनही त्या शिफारशी लागू झालेल्या नाहीत. आता सत्ता नसताना तेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हल्लाबोल करतात. म्हणजेच काँग्रेस असो की भाजपचे सरकार, शेतकऱ्यांचे कुठलेही घेणे-देणे या सत्ताधाऱ्यांना नाही. भाजप सरकारने अपघात विमा व पीकविम्यातून कंपन्यांचे खिसे भरले. सत्तेवर बसणाऱ्यांवर लगाम ठेवण्याचे काम आता 'प्रहार' करणार आहे. शेतकऱ्यांप्रति तळमळ ठेवून या आसूड यात्रेतून शेतकरी, जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका आम्ही पार पाडू, असे आ. बच्चू कडू म्हणाले. शेतकरी व कार्यकर्त्यांच्या भरगच्च उपस्थितीमुळे सभास्थळ खचाखच भरले होते.चांदूर रेल्वेमार्गे 'आसूड' यात्रायवतमाळ जिल्ह्यातील दाभडी येथून आसूड यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी मंगळवारी रात्री ११ वाजता चांदूर रेल्वे मार्गाने ही आसूड यात्रा तिवसा तालुक्यात दाखल झाली. कुऱ्हा येथे या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीत मुक्काम ठोकला. सकाळी आ. बच्चू कडू यांनी महासमाधीचे दर्शन घेतले. ही यात्रा अमरावती-नागपूर महामार्गाने बुधवारी सकाळी ११ वाजता तिवसा नगरपंचायतजवळ पोहोचली. येथे जाहीर सभा घेण्यात आली.पोटाचा प्रश्न मिटलेला नाही; शौचालयाची सक्तीशेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील, तर शेतमालाला भाव दिला पाहिजे. पण, आज ऊसाचा भाव कमी करून पाकिस्तानातून साखर आयात करण्याचे उफराटे धोरण राबविले जात आहे. लोकांना रोजगार नाही. पोटावर लाथ मारली जात आहे. पोटाचाच प्रश्न मिटलेला नाही अन् दुसरीकडे शौचालय बांधण्यास सांगितले जात असल्याची टीका आ.कडू यांनी केली.