शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुननगरच्या फ्लॅटमधील देहव्यापाराचा अड्डा उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 22:49 IST

२५ दिवसांपूर्वी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमधील देहव्यापार स्थानिक रहिवाशांनी बंद पाडला. याप्रकरणी माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास गाडगेनगर पोलिसांनी अर्जुननगर स्थित यश अपार्टमेंट येथे धाड टाकून दोन तरुणांसह एका महिलेस ताब्यात घेऊन ठाण्यात आणले.

ठळक मुद्देदोन पुरुष, एक महिला ताब्यात : जागरूक नागरिकांनी केले पोलिसांना पाचारण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : २५ दिवसांपूर्वी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमधील देहव्यापार स्थानिक रहिवाशांनी बंद पाडला. याप्रकरणी माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास गाडगेनगर पोलिसांनी अर्जुननगर स्थित यश अपार्टमेंट येथे धाड टाकून दोन तरुणांसह एका महिलेस ताब्यात घेऊन ठाण्यात आणले.अर्जुननगर परिसरातील जिव्हेश्वर कॉलनीतील यश अपार्टमेंट या चार मजली इमारतीच्या तळमजल्यावर विलासनगरातील रहिवासी विधळे यांच्या मालकीचा फ्लॅट आहे. सुमारे २५ दिवसांपूर्वी एका कुटुंबाने तो फ्लॅट रिकामा केला. यानंतर घरमालकाने तो एका तरुणास भाड्याने दिला. काही दिवसांपासून त्या फ्लॅटमध्ये तरुण-तरुणींचे वेगवेगळे जोडपे संशयास्पद स्थितीत ये-जा करीत असल्याची भनक तेथील रहिवाशांना लागली होती. हा देहव्यापाराचाच प्रकार असल्याचा संशय रहिवाशांमध्ये बळावला होता. त्यामुळे येथील हालचालींबाबत पाळतदेखील ठेवण्यात आली होती. शुक्रवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास एक तरुण-तरुणीचे जोडपे फ्लॅटमध्ये आल्याचे रहिवाशांना कळले. त्यांनी या प्रकाराची माहिती तडक गाडगेनगर पोलिसांनी दिली. गाडगेनगरचे पोलीस उपनिरीक्षक व्ही.सी. धाडसे यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांना तेथे एक तरुण व तरुणी आढळून आले.पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता, एका अज्ञाताने फोन करून आम्हाला या जागी जाण्यास सांगितल्याचे ते जोडपे पोलिसांना सांगू लागले होते. यादरम्यान पोलिसांनी तरुण-तरुणीच्या जोडप्यासह भाड्याने फ्लॅट घेणाऱ्या एका तरुणास वाहनात बसून ठाण्यात नेले.अर्जुननगरात या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. फ्लॅटमधील महिला व पुरुष मंडळी घराबाहेर आली होती. या प्रकाराचा पदार्फाश झाल्याचे समाधान नागरिकांच्या चेहºयांवर होते. रात्री उशिरापर्यंत गाडगेनगर पोलिसांची कारवाई सुरू होती. मात्र, वृत्त लिहिस्तोवर पोलिसांत तक्रार झाली नव्हती. भाडेकरु ठेवताना घरमालकाने त्याचे विवरण पोलिसांना देणे आवश्यक असते. मात्र या घरमालकाने पोलिसांकडे भाडेकºयाची नोंद केली नव्हती.आरती खाडे यांचा अभिनंदनीय पुढाकारबरेच दिवसांपासून हा देहव्यापाराचा प्रकार सुरू आहे. रात्री दीड-दोन वाजेपर्यंत लोक येत-जात राहायचे. इतक्या गाड्या आणि इतके लोक यापूर्वी कधीही आले नव्हते. मुलींनी चुकीच्या मार्गाने जाऊ नये, मुलांनी मुलींचा गैरवापर करू नये, यासाठी आम्ही सतत जागरूक आहोत. सुरुवातीला आम्ही मुलामुलींना समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु बहीण आहे, नातेवाईक आहेत, फ्लॅट बघायला आलो आहोत, अशी कारणे देऊन आमच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. अखेरीस आज आम्ही रंगेहात पकडूनच दिले, अशी माहिती आरती खाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. खाडे या पेशाने शिक्षक असून त्या सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. खाडे यांच्या पुढाकाराने पोलिसांना या अड्ड्याचा पर्दाफाश करता आला.४२ वर्षीय महिलेसह दोन तरुणांना ताब्यात घेतले होते. तरुणांवर कलम १५१ नुसार कारवाई करण्यात आली.- मनीष ठाकरेपोलीस निरीक्षक, गाडगेनगर