शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अरुण साधूंचे होते अमरावतीशी नाते, परतवाड्यात झाला होता जन्म 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 18:52 IST

- नरेंद्र जावरेअमरावती, दि. २५ -  पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात आगळा ठसा उमटवून नुकताच जगाचा निरोप घेणा-या अरूण साधू यांचे जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील परतवाडा हे आहे. सन १९४१ मध्ये परतवाड्यातील प्रसिद्ध विदर्भ मीलच्या क्वॉर्टरमध्ये त्यांचा जन्म झाला. चवथीपर्यंतचे शिक्षण त्यांनी परतवाडा नगरपालिकेच्या शाळेत पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण अमरावतीच्या सायन्सस्कोर हायस्कूल, ...

- नरेंद्र जावरेअमरावती, दि. २५ -  पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात आगळा ठसा उमटवून नुकताच जगाचा निरोप घेणा-या अरूण साधू यांचे जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील परतवाडा हे आहे. सन १९४१ मध्ये परतवाड्यातील प्रसिद्ध विदर्भ मीलच्या क्वॉर्टरमध्ये त्यांचा जन्म झाला. चवथीपर्यंतचे शिक्षण त्यांनी परतवाडा नगरपालिकेच्या शाळेत पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण अमरावतीच्या सायन्सस्कोर हायस्कूल, तर महाविद्यालयीन शिक्षण विदर्भ महाविद्यालयात त्यांनी घेतले. अरूण साधू यांचे वडील मार्तण्डराव साधू परतवाडा येथील विदर्भ मिलमध्ये ‘पिनिंग मास्तर’ पदावर कार्यरत होते. विदर्भ मील परिसरातील निवासस्थानात त्यांचे वास्तव्य होते. मील बंद पडल्याने शेकडो कामगारांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली. त्यानंतर अरूण यांचे वडील मार्तण्डराव हे परतवाडा येथील जयस्तंभ चौकानजीकच्या धर्माधिकारी वाड्यात वास्तव्याला गेले. त्यांचे येथील घर आता नामशेष झाले आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी अमरावती येथील सायन्सस्कोर शाळेत अरूण साधूंनी प्रवेश घेतला. विदर्भ महाविद्यालयात ते बी.एस्सी.पर्यंत शिकले. एका विषयात ते अनुत्तीर्ण झाले होते. त्यावर्षी त्यांनी जामठी (माना) येथे एका शाळेत शिक्षकाची नोकरीही केली. 

पोहण्यात तरबेज अरूण साधू आणि श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष सुरेश देशपांडे हे आत्ये-मामेभाऊ. या दोघांची खास मैत्री होती. ते दररोज सायंकाळी पोहण्यासाठी श्री हव्याप्र मंडळात जात असत, अशी आठवण सुरेश देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली. अमरावतीतील अशोक गोखले, कर्नल अरूण जोशी यांच्याशीदेखील त्यांची मैत्री होती. 

मुगलाईपुऱ्यातील वाचनालयात केले वाचन परतवाडास्थित मुगलाईपुºयाला लागून असलेल्या सार्वजनिक वाचनालयात अरुण साधू नेहमी जात असत. तेथूनच त्यांना वाचनाचा व्यासंग जडल्याचे ज्येष्ठ वैदर्भीय हास्यकवी राजाभाऊ धर्माधिकारी यांनी सांगितले.

शेवाळकर-साधू कुटुंबाची जवळीकज्येष्ठ साहित्यिक राम शेवाळकर अचलपूर येथील रहिवासी असल्याने अरूण साधू यांची त्यांच्या माळवेशपुºयातील घरी सतत ये-जा असायची. दोघांनाही साहित्याची आवड असल्याने साहित्यावर प्रदीर्घ चर्चा रंगत असे. अरूण साधू यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे. परंतु त्यांचे कार्य अविस्मरणीय राहणार असल्याचे मत दिवंगत राम शेवाळकर यांच्या पत्नी विजया शेवाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.