अभिनय कार्यशाळा : गणेश हलकारे यांचे प्रतिपादनअमरावती : कलावंतांनी कलेची साधना करताना विवेकवादी, विज्ञानवादी दृष्टी स्वीकारली पाहिजे. जो कलावंत जीवनवादी आहे तोच सामाजिक बांधिलकी जपू शकतो, असे उद्गार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र संघटक गणेश हलकारे यांनी काढले. येथील युनिव्हर्सल स्पोटर््स अँड कल्चरल अकादमीच्यावतीने आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय अॅडव्हांस अभिनय कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी ‘फाऊंडेशन फॉर आर्टिस्ट एंड क्राफ्ट्समेनशिप इम्पावरमेंट' (इंडिया) चे संचालक आणि अजिम प्रेमजी इंस्टिट्यूट बंगलोर (कर्नाटक)चे थिएटर कौन्सिलर के.आर. उपेन्द्र प्रशिक्षक म्हणून तर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि ‘मास्वे’चे अध्यक्ष अंबादास मोहिते, मानस सल्लागार पंकज वसाडकर, नाट्यकर्मी गोपाल राणे आणि सुरेश बारसे आदी उपस्थित होते. याप्रसंगी के.आर. उपेंद्र, पंकज वसाडकर, सुरेश बारसे, गोपाल राणे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यशाळेचे संयोजक दिलीप खत्री यांनी प्रास्ताविक तर व्यवस्थापकीय भाष्य, समन्वयक रत्नाकर शिरसाट यांनी केले. कार्यशाळेचे संचालक आणि वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या परफोरमिंग आर्ट्स (फिल्म एंड थिएटर) डीपार्टमेंटचे सतीश पावडे यांनी कार्यशाळेच्या आयोजनाची भूमिका विशद केली. पाहुण्यांचे स्वागत महक खत्री, श्रावणी आणि आनंदी कथिलकर, तपस्या कुऱ्हेकर, अंकिता चौधरी, आदित्य चावरे यांनी केले. दीपक वानखेडे, इशिता खत्री, नितेश तिवारी, रवी घुले, गणेश भोयर, अक्षय गवई, आदित्य एकोतखाने, प्रदीप घडेकर, भूषण उंबरकर यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन दीपाली बाभुळकर तर आभार प्रदर्शन संगीता सोळंखे-इंझालकर यांनी केले. कार्यशाळेसाठी आनंद देशमुख, नितीन बोबडे, पूजा गुंबले, मंदा नांदुरकर, पुष्पा साखरे, गौरव काळे, गणेश थोरात, विलास पकडे, चंद्रकांत आठल्ये, आशिष यावले आणि बंडू कथिलकर यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)
कलावंतांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी
By admin | Updated: September 14, 2015 00:03 IST