शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

धारणी शहरात कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:24 IST

शहरक्षेत्रात पाणी मुबलक असले तरी नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना तीन दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. बोअरवेलच्या मोटर नादुरुस्त झाल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नियमित पाणीपुरवठ्यासाठी लागणारी बांधबंदिस्ती न केल्याने पुरेशा दाबाने पाणी उपसा होत नाही.

ठळक मुद्देतीन प्रभागांमध्ये बोअर नादुरुस्त। पाणीपातळी खोल, उपशावर मर्यादा

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : शहरक्षेत्रात पाणी मुबलक असले तरी नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना तीन दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. बोअरवेलच्या मोटर नादुरुस्त झाल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नियमित पाणीपुरवठ्यासाठी लागणारी बांधबंदिस्ती न केल्याने पुरेशा दाबाने पाणी उपसा होत नाही. उपाययोजना सूचविल्या गेल्या; मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने नागरिकांची परवड होत आहे.नगरपंचायत व तालुका प्रशासनानुसार, शहर परिसरातील भूगर्भात मुबलक पाणी आहे. स्थानिक नगरपंचायतने शहरवासीयांसाठी १७ प्रभागांत १७ बोअरवेल केल्या. मात्र, तूर्तास तीन प्रभागांमध्ये बोअर नादुरुस्त झाल्याने तेथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.सन २०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या १५ हजार आहे. ती आता २५ हजारांच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. बोअरवेलच्या माध्यमातून होणाºया पाणीपुरवठ्यासाठी १८०० नागरिकांना नळ जोडणी देण्यात आली आहे. यंदा सर्वच भागात पाण्याची पातळी खोलवर गेल्याने बोअरच्या दैनंदिन उपशास मर्यादा आल्या आहेत. इलेक्ट्रिक मोटर बोअरवेलमध्ये खाली सोडाव्या लागत आहेत. पाणीपातळी खोल गेल्याने जुन्या मोटर अधिक दाबाने पाणी खेचू शकत नाही. तेथे नवीन मोटर लावण्याची गरज आहे. मात्र, त्याचे नियोजन करण्यात आलेले नाही. नळ आणि टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा अनियमित असल्याने लोकांमधून संताप व्यक्त होत आहे.पाणीपट्टी कर नियमित भरत असताना आमच्याच नशिबी पाणीटंचाई का, असा संतप्त सवाल धारणीकर विचारू लागले आहेत. मात्र, आचारसंहितेमुळे प्रस्तावांना मान्यता मिळाली नाही, असे ठेवणीतील उत्तर नगरपंचायत प्रशासनाकडून नागरिकांना दिले जात आहे.नगरपंचायत प्रशासनाकडून नियोजन कागदोपत्रीनगरपंचायत प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी पाणीटंचाईसंदर्भातील नियोजन कागदोपत्री केले. पाणीटंचाई निवारणार्थ १४ लाखांची तरतूद करण्यात आली. मात्र, मे महिना संपत असताना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे पंचायतीचे नियोजन बारगळले आहे. त्याचा फटका शहरवासीयांना बसत आहे.तीन महिन्यांपूर्वी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १४ लाखांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने त्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. मान्यता मिळाल्यास नवीन मोटर खरेदी केल्या जातील.- सूर्यकांत पिदूरकर,मुख्याधिकारी, धारणी 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई