शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
3
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
4
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
5
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
6
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
7
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
8
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
9
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
10
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
11
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
12
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
13
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
14
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
15
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
16
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
17
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
18
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
19
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
20
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची

उन्हामुळे भाजीपाल्याची कृत्रिम भाववाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2016 00:21 IST

शहरातील किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी कृत्रिमरीत्या भाववाढ करून भाजीपाल्यांची नियमबाह्य दामदुप्पट भावाने विक्री सुरू केली आहे.

कांद्याची दामदुप्पट भावाने विक्री : ग्राहकांना धरले वेठीसअमरावती : शहरातील किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी कृत्रिमरीत्या भाववाढ करून भाजीपाल्यांची नियमबाह्य दामदुप्पट भावाने विक्री सुरू केली आहे. सामान्य ग्राहक मात्र चांगलाच वेठीस धरला जात आहे. भाजीपाला विक्रेत्यांनी एवढी दबंगगिरी वाढली की अनेक प्रकारच्या भाजीपालामध्ये दीडसे ते चारशे टक्के एवढा नफा कमावला जात आहे. त्यामुळे महागईच्या काळात भाजीपाल्यांचे भाव चांगलीेच वधरल्यामुळे व हे भाव मनमर्जीने वाढविल्या जात असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या डोळ्यात मात्र पाणी येत आहे. कांदा नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. गुरुवारी अमरावती बाजार समितीत फेरफटका मारला असता बुधवारी पांढऱ्या कांद्याची आवक, ३००किंटल एवढी झाली होती. या कांद्याला किंटलमागे कमीत कमी ४०० रुपये व जास्तीत जास्त ६००रुपये भाव मिळाला. लाल कांद्याची आवक १००किंटल झाली तर हा कांद्याला ठोक भावात ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. परंतु हर्रास झाल्यानंतर भाजीपाला विक्रेते संगनमताने भाववाढ करून ठोकमध्ये ४ रुपये, तर चिल्लर भाव १० ते १२ रुपये किलोने विक्री सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांची ही शुध्द लूट असून यातून चिल्लर भाजीपाला दीडशे ते दोनशे पट एवढा नफा कमावला जात आहे. अमरावतीत ५०० च्या वर किरकोळ भाजीविक्रेते आहेत. ६०० ते ७०० फेरीवाले भाजीेपाला विक्री करतात. त्यामुळे या व्यवसायातून रोज कोट्यवधी रुपयांची खरेदी विक्री होते. जर अशाप्रकारे भाजीपाला विक्रेत्यांकडून कृत्रिम लूट होत असेल तर यावर नियंत्रण कुणाचे, असा प्रश्न पडत आहे. मात्र जो शेतकरी काबाडकष्ट करून माल पिकवितो. त्याला बाजारपेठेत पाहिजे तसा भाव मिळत नाही. व्यापारी त्याचा भाव पाडतात. त्यामुळे एकीकडे शेतकरी हवालदिल होत आहे व दुसरीकडे मोठे व्यापारी भाव पाडण्याचा घाट रचत आहेत. दुसरीकडे भाजीविक्रे ते प्रंचड भाववाढ करून सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा गोरखधंदा करीत आहे. कांदा हा दैनंदिन जीवनातला महत्त्वाचा घटक असल्यामुळे नागरिकांना दामदुप्पट भाव देऊन तो विकत घ्यावाच लागतो. त्यामुळे विक्रेते याचा गैरफायदा घेत आहेत.२ग्रामीण भागातील कांद्याला मागणी कांदेयाची आवक सध्या चांगली आहे. पूर्वी नाशिकचा कांदा यायचा. आता अंजनगाव, परतवाडा, चांदूरबाजार, अचलपूर भागातील कांदा अमरावतीत दाखल होत आहे. पांढऱ्या कांद्याची ३०० किंटल तर लाल कांद्याची १०० क्विंटल रोज आवक होत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत नसल्याची ओरड आहे.