अमरावती : गुन्ह्यासाठी लपून बसलेल्या संशयिताला बडनेरा पोलिसांनी बडनेराच्या जुनी वस्तीतील रेल्वे क्वार्टर परिसरातून रविवारी रात्री अटक केली. शेख आसिफ शेख बशीर (२४, रा. इंदिरानगर, बडनेरा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------------------------------
सातुर्णा चौकात अवैध दारू जप्त
अमरावती : राजापेठ पोलिसांनी सातुर्णा चौकात कारवाई करून अवैध दारूसह ७९,९८४ रुपयांचा मुद्देमाल रविवारी जप्त केला. मुन्ना ऊर्फ प्रज्वल छत्रपती बांबुर्डे (२८, रा. संजय गांधीनगर), रीतेश सुनील कानकिरड (१८, रा. महाजनपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
--------------------------------------------
इर्विन रुग्णालयात इसमाचा मृत्यू
अमरावती: छातीत दुखत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या वृद्धाचा शनिवारी मृत्यू झाला. अरविंद देवराव शेवतकर (६५, रा. रेवसा) असे मृताचे नाव आहे. वलगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.