शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या शाळा निरीक्षकाला अटक

By admin | Updated: June 28, 2014 23:20 IST

शहरातील महापालिकेच्या मराठी शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिकेचे मानसिक व शारीरिक शोषण केल्याच्या आरोपाखाली फ्रेजरपुरा पोलिसांनी महापालिकेच्या शाळा निरीक्षकाला अटक केली.

प्रभारी मुख्याध्यापिकेची तक्रार : लैंगिक शोषणाचा आरोपअमरावती : शहरातील महापालिकेच्या मराठी शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिकेचे मानसिक व शारीरिक शोषण केल्याच्या आरोपाखाली फ्रेजरपुरा पोलिसांनी महापालिकेच्या शाळा निरीक्षकाला अटक केली. या घटनेमुळे महापालिका प्रशासनासहित शिक्षण क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.अटक करण्यात आलेल्या शाळा निरीक्षकाचे नाव प्रवीण रावसाहेब पाटील (४१, राधानगर, समृध्दी अपार्टमेंट) असे आहे. महापालिकेच्या मराठी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत व अलीकडेच प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या शिक्षिकेला गेल्या सहा महिन्यांपासून शाळा निरीक्षक त्रास देत होता. शाळेच्या कामकाजात त्रुटी काढून कारणे दाखवा नोटीशी बजावणे, सतत भ्रमणध्वनीवरून त्रास देणे, शिक्षिकेचा पाठलाग करणे, अश्लील संभाषण करून हैराण करणे आदी प्रकार या शाळा निरीक्षकाद्वारे केले जात होते. सदर शिक्षिका फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वस्तीत मुलीसमवेत एकट्याच राहतात. त्यांचे पती पुणे येथे कार्यरत आहेत.सततच्या त्रासाबद्दल या शिक्षिकेने तिच्या पतीकडे तक्रार केली होती. पतीने शाळा निरीक्षकाला समज दिली होती. परंतु त्यानंतरही शाळा निरीक्षकाचा त्रास सुरूच होता. दोन वेळा दारू पिऊन या निरीक्षकाने शिक्षिकेच्या घरात शिरून धुमाकूळ घातला. शिक्षिकेचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्नदेखील केला. शाळा निरीक्षकाच्या या कृत्याने घाबरलेल्या शिक्षिकेने त्यांच्या पतीला शहरात बोलावून शुक्रवारी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांची भेट घेतली. घार्गे यांनी शिक्षिकेच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रियाजुद्दीन देशमुख यांना तक्रार नोंदविण्याचे आदेश दिले. ठाणेदार देशमुुख यांच्या मार्गदर्शनात एसएसआय गजानन कोठेकर, नीलेश वानखडे यांच्या चमूने आरोपी प्रवीण पाटील याला उशिरा रात्री अटक केली. त्याच्याविरूध्द भादंविच्या कलम ३५४, ३५४ (अ), ३५४ (ब), ३५४ (क), ३५४ (ड), ४५२, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान प्रवीण पाटील याला या प्रकरणी न्यायालयाने जामीन दिला आहे. प्रभारी मुख्याध्यापिकेने केलेल्या आरोपाचे पाटील यांच्या वकिलांनी खंडन केले. (प्रतिनिधी)