शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कॉल गर्ल आहेस ना, एक मुलगी दे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:16 IST

नांदगाव खंडेश्वर/ अमरावती : प्रेमप्रकरणातून महिला, मुलीच्या विनयभंगाचे प्रकार समाजात नवीन नाहीत. ब्रेकअप झाल्यानंतरही प्रेयसीचा पाठलाग करण्याच्या घटनादेखील नित्याच्याच. ...

नांदगाव खंडेश्वर/ अमरावती : प्रेमप्रकरणातून महिला, मुलीच्या विनयभंगाचे प्रकार समाजात नवीन नाहीत. ब्रेकअप झाल्यानंतरही प्रेयसीचा पाठलाग करण्याच्या घटनादेखील नित्याच्याच. मात्र, एका साध्या सरळ तरुणीच्या दुकानात शिरून तिचा विनयभंग केल्याची घटना येथे घडली. चक्क ‘तू कॉल गर्ल आहेस का, अशी विचारणा करून आपल्याला एका मुलीची आवश्यकता असल्याची निर्लज्ज बतावणी आरोपीने केली.

तालुक्यातील एक २७ वर्षीय तरुणी एका ठिकाणी कलाकुसरीचे धडे देते. ती १६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते ४.३० च्या सुमारास तेथे हजर असताना आरोपी पवन दाढे (२७, रा. फुबगाव) हा तिच्या दुकानात शिरला. त्याने अतिशय निर्लज्ज भाषेत शरीरसुखासाठी त्याला मुलीची आवश्यकता असल्याचे पीडिताला सांगितले. या अचानक घडलेल्या घटनेने ती तरुणी नखशिकांत हादरली. उपस्थित तरुणी, महिलांनी तिला धीर दिला. घटनेबाबत पोलीस तक्रार नोंदविण्यात आली. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी १७ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपी पवन दाढे याच्याविरूद्ध कलम ४५१, ३५४ (आय), (१) (२) अन्वये गुन्हा दाखल केला.

कोट

गुन्हा दाखल झाल्याबरोबर आरोपीच्या शोधार्थ पथक पाठविण्यात आले. मात्र, तो घरी आढळून आला नाही. आरोपीचा लवकरच अटक करण्यात येईल.

- हेमंत ठाकरे,

ठाणेदार, नांदगाव खंडेश्वर