शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

विमा भरपाईसाठी प्रहारचे अर्धनग्न आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 22:56 IST

अद्याप अनेक शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यांना देण्यात आलेली भरपाई तांत्रिक कारणामुळे रिलायन्स कंपनीला परत गेली. ही भरपाई त्वरित मिळावी, यासाठी प्रहारद्वारा मार्च महिन्यात निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देएसएओ कार्यालयात ठिय्या : कंपनीला गेलेली विमा भरपाई तात्काळ द्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अद्याप अनेक शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यांना देण्यात आलेली भरपाई तांत्रिक कारणामुळे रिलायन्स कंपनीला परत गेली. ही भरपाई त्वरित मिळावी, यासाठी प्रहारद्वारा मार्च महिन्यात निवेदन देण्यात आले. मात्र, याकडे कृषी अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसह शुक्रवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या देत अर्र्धनग्न आंदोलन केल्याने एकच खळबळ उडाली.जिल्ह्यातील ४५ हजार शेतकरी विमा भरपाईसाठी पात्र ठरले व त्यांना ६४ कोटींची भरपार्ई बँक खात्यात जमा केल्याचे सांगण्यात आले. अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रिलायन्स कंपनीद्वारा आरटीजीएसद्वारे भरपाई जमा करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात काही शेतकऱ्यांना खात्यामध्ये ही भरपाई जमाच झाली नसल्याचे दिसून आले. परत गेलेली रक्कम शेतकऱ्यांना पुन्हा मिळावी, यासाठी कृषी विभागाने आश्वासन दिले. प्रत्यक्षात कुठलेच प्रयत्न केले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यामुळे प्रहार पदाधिकाºयांनी शुक्रवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या दिला. यावेळी कृषी संचालक अनिल खर्चान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही भरपाई शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.