शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन असलेल्या रुग्णवाहिकांकडून मनमानी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:14 IST

अमरावती : कोरोनाचे वाढत्या संसर्गात काही रुग्णांची प्रकृती गंभीर होत असल्याने त्यांना ऑक्सिजनची उपलब्धता असणाऱ्या रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलला नेले जाते ...

अमरावती : कोरोनाचे वाढत्या संसर्गात काही रुग्णांची प्रकृती गंभीर होत असल्याने त्यांना ऑक्सिजनची उपलब्धता असणाऱ्या रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलला नेले जाते व प्रसंगी बेड उपलब्ध नसल्यास अन्य रुग्णालयातही जावे लागते. परंतु यासाठी रुग्णावाहिकेच्या दराबाबत मात्र, एकवाक्यता नाही. रुग्णांच्या नातेवाईकाची हतबलता असल्याने मनमानी दराची आकारणी होत असल्याचा आरोप होत आहे.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात अनेक रुग्णावाहिकांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कधी मोफत तर कधी माफक दरात सेवा दिलेली आहे. मात्र, त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये झालेला कोरोना उद्रेक व आता मार्च महिन्यांपासून वाढलेल्या कोरोना संसर्गात मात्र रुग्णांच्या नातेवाईकांच्या हतबलतेचा गैरफायदा घेतला जात असल्याचे काही उदाहरण समोर येत आहे.

जिल्ह्यात ऑक्सिजनची सुविधा असणाऱ्या २९ रुग्णवाहिका आहेत. त्यापेक्षा जास्त खासगी आहेत. या रुग्णवाहिका चालकांद्वारा आता शासनाद्वारा निश्चत केलेले दर बासनात गुंडाळून ठेवले आहे व याउलट दामदुप्पट भावाने आता आकारणी केली जात आहे. याबाबत अद्याप तक्रार प्राप्त नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. यावर नियंत्रण कुणाचे, असा सवाल रुग्णांचे नातेवाईक करीत आहे.

पाईंटर

ऑक्सिजन असलेल्या : २९

शासकीय रुग्णवाहिका : १३०

ऑक्सिजन असलेल्या : २०

खासगी रुग्णवाहिका : २२१

बॉक्स

नियंत्रण कुणाचे?

शासकीय रुग्णवाहिका मोफत असली तरी ती वेळेवर उपलब्ध होईल याची काही शास्वती नाही. त्यामुळे ऐनवेळी खासगी रुग्णवाहिकेला बोलवावे लागते. व परिस्थिती असी असते की त्याने मागेल ते दर मुकाट्याने द्यावे लागतात, नाही तर हा विलंब रुग्णांचे जीवावर बेतणारा असतो. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी अवस्था झालेली आहे.

बॉक्स

रुग्णांचे नातेवाईक हतबल

शासकीय रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नाईलाजास्तव खासगी रुग्णावाहिकेचा आधार घ्यावा लागतो, अशावेळी शासनाद्वारा निश्चित दराला विचारतो कोण? अशी परिस्थती उद्भवते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दर निधार्रीत केले असले तरी रुग्णवाहिका चालक सांगेल ते दर मुकाट्याने द्यावे लागत असल्याची व्यथा रुग्णाचे नातेवाईकांनी बोलून दाखविली.

बॉक्स

तक्रार करायची तरी कुठे?

ऑक्सिजन असलेल्या खासगी रुग्णवाहिकेच्या मनमानी दराच्या बाबतीत तक्रार करायची तरी कुठे, असा रुग्णांचे नातेवाईकांचा सवाल आहे. यासंर्दभात जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ यांच्याकडे तक्रार दाखल करता येईल, असे सांगण्यात आले. याविषयीची पुरेशी प्रसिद्धी होणे महत्त्वाचे आहे.

कोट

ऑक्सिजन असलेल्या रुग्णवाहिकेच्या दरासंदर्भात यापूर्वीच दरनिश्चिती करण्यात आलेली आहे. त्यानुसारच भाडे घेणे महत्त्वाचे आहे. आगाऊ दर आकारणी झाल्यास त्याविषयीची तक्रार करावी.

- शैलेश नवाल,

जिल्हाधिकारी