शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

मनपसंत ‘चॉइस नंबर’ साठी राज्यातील हौशींनी मोजले तब्बल ७७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 15:00 IST

वाहनाचा मनपसंत क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी परिवहन विभागाकडे तब्बल ७७ कोटी रुपये मोजलेत. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांतील ही आकडेवारी आहे.

ठळक मुद्दे९९ हजार वाहनधारकांनी मिळविला चॉइस नंबरपुण्यात सर्वाधिक हौशी गाडीधारक

प्रदीप भाकरेआॅनलाईन लोकमतअमरावती : वाहनाचा मनपसंत क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी परिवहन विभागाकडे तब्बल ७७ कोटी रुपये मोजलेत. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांतील ही आकडेवारी आहे. राज्यातील ९९ हजारांवर वाहनधारकांनी पाच हजार ते तब्बल अडीच लाख रुपये भरून हे ‘चॉइस नंबर’ मिळविले आहेत. त्यातील १७ जणांनी तर अडीच लाख रुपये किंमत असलेले क्रमांक ७१ लाखांना मिळविले. २३.४५ कोटी रुपये महसूल मिळवून पुणे विभाग यामध्ये अव्वल ठरला आहे.वाहनधारकांच्या विशिष्ट क्रमांकावर पडणाऱ्या उड्या लक्षात घेऊन आरटीओनेही त्यातून महसूल मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले. हौशी लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्याअनुषंगाने आरटीओने ०१ व ९९९९ या क्रमांकासह ०७८६, १११, ४४४, ५५५ असे विविध चॉइस नंबर उपलब्ध केले. ०००१ या क्रमांकासाठी तर अडीच ते तीन लाख रुपये आकारणी केली जाते. पाच हजारापासून ते अडीच लाख रुपयांच्या पुढे हे क्रमांक उपलब्ध आहेत. आरटीओने ही नोंदणी आॅनलाइनदेखील केली आहे. एप्रिल ते ३० आॅक्टोबर २०१७ या कालावधीत पसंतीच्या वाहनक्रमांकातून आरटीओच्या १२ विभागीय कार्यालयांना ७७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. राज्यातील ९९ हजार वाहनधारकांनी पसंतीचे क्रमांक मिळविले.६७ हजार वाहनधारक पाच हजारीराज्यातील ६७,६५७ वाहनधारकांनी प्रत्येकी पाच हजार रुपये भरून पसंतीचे क्रमांक मिळविले. त्यातून आरटीओला २८.५३ कोटी रुपये महसूल मिळविले. १६,९१० वाहनधारकांनी ५ ते ७ हजार रुपये किंमत असलेले पसंती क्रमांक मिळविलेत. ७५०१ ते १० हजार रुपये किंमत असलेले क्रमांक मिळवून १६०२ वाहनधारकांनी आरटीओच्या तिजोरीत १.६० कोटींची भर घातली. १० ते २० हजार किमतीचे क्रमांक ६१३३ वाहनधारकांनी मिळविले. त्यातून आरटीओला ८.८६ कोटी रुपये प्राप्त झालेत. २० ते ५० हजार रुपये प्रत्येकी भरून ६,०३२ वाहनधारकांनी, तर ५० हजार ते एक लाख रुपये किमतीचे क्रमांक मिळवून २६७ जणांनी १.९१ कोटी रुपये खर्च केलेत. ३११ वाहनधारकांनी १ लाख ते अडीच लाख रुपये किमतीचे पसंतीचे क्रमांक मिळविलेत. त्यातून आरटीओला ४.९२ कोटींचा महसूल मिळाला.विभागनिहाय मिळालेला महसूल (कोटीत)विभाग प्रकरणे                  महसूलबृहन्मुंबई                          ६६५२ ६.०८ठाणे                                  १०७४४ ९.९८पनवेल                              ३८०१ २.७१कोल्हापूर                          १०६११ ७.३०पुणे                                   ३०३६६ २३.४५नाशिक                            २७५४५ १९.५९धुळे                                  ८३७ ०.५८औरंगाबाद                        ३५७२ २.८०लातूर                               ३१० ०.३०नांदेड                                १२८१ १.०६अमरावती                          १२९७ १.०७नागपूर                               १५६२ १.१३

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस