शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ८९८ नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 13:32 IST

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति ओढ निर्माण व्हावी, यासाठी राज्यात ८९८ नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. गट, शहर साधन केंद्रांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ही नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभारली जातील.

ठळक मुद्देउभारणीसाठी ई-निविदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति ओढ निर्माण व्हावी, यासाठी राज्यात ८९८ नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. गट, शहर साधन केंद्रांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ही नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे उभारली जातील. त्याकरिता ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०१९-२० या वर्षात मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे साकारले जात आहेत. या केंद्रांच्या उभारणीसाठी यू-डायस २०१८-१९ च्या माहितीवरून आणि जिल्हा परिषद, महापालिकेत असलेल्या गट, शहर साधन केंद्रातील अतिरिक्त स्वतंत्र वर्गखोली, विद्युत सुविधा, शाळेची पटसंख्या आदी निकषांना आधारभूत ठेवून नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारणीसाठी शाळांची निवड करण्यात आली आहे. ठाणे येथील मीत एंटरप्रायजेस या पुरवठादाराकडून नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारणीनंतर गठित समितीमार्फत भेट देऊन साहित्याची पडताळणी करण्यात येणार आहे. समिती पथकाच्या पडतळणीपर्यंतची जबाबदारी पुरवठादार, मुख्याध्यापकांवर असणार आहे. नावीन्यपूर्ण केंद्राचा वापर शाळांनी दररोज करावा, असे राज्य प्रकल्प संचालक वंदना कृष्णा यांनी आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे. मराठी माध्यमांच्या ७९८, तर उर्दू माध्यमाच्या १०० शाळांसाठी नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत.मुख्याध्यापकांकडे जबाबदारीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये हे केंद्र साकारण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविली आहे. विद्युत पुरवठ्यासह ५०० चौरस फूट आकाराची आरसीसी स्लॅब असणारी वर्गखोली पुरवठादारास तातडीने उपलब्ध करून द्यावेत, असे मुख्याध्यापकांना कळविले आहे तसेच शाळेत नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारणीची प्रक्रिया करताना गणित, विज्ञान विषयाच्या शिक्षकांची नेमणूक करावी लागणार आहे.जिल्हानिहाय मंजूर केंद्रअहमदनगर- ३०, अकोला -२४, अमरावती -४५, औरंगाबाद -२२,भंडारा- १४, बीेड- २४, बुलडाणा- ३९, चंद्रपूर- ४५, धुळे- १५, गडचिरोली -२४, गोंदिया- १६, हिंगोली -१०, जळगाव -३२ जालना- १६, कोल्हापूर- ३८, लातूर- २४, मुंबई- २४, नागपूर- ५४, नांदेड -३४, नंदूरबार-१२, नाशिक -३६, उस्मानाबाद- १६, पालघर -१६, परभणी -३०, पुणे -४०, रायगड-३०, रत्नागिरी- १८, सांगली -२२, सातारा-२२, सिंधुदूर्ग- १६, सोलापूर-२६, ठाणे- २४,वर्धा- १६, वाशिम- १२, यवतमाळ- ३२

टॅग्स :scienceविज्ञान