शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुननगरात ‘त्या’ जागेवर वाचनालयाला मंजुरी

By admin | Updated: January 20, 2016 00:36 IST

लोकायुक्तांच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने येथील अर्जूननगरातील अतिक्रमित धार्मिक स्थळ हटविण्याबाबतची कारवाई सोमवारी केली.

निर्णय : प्रदीप दंदे, प्रकाश बनसोड, प्रशांत वानखडे, प्रदीप बाजड यांचा पुढाकारअमरावती: लोकायुक्तांच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने येथील अर्जूननगरातील अतिक्रमित धार्मिक स्थळ हटविण्याबाबतची कारवाई सोमवारी केली. मात्र या जागेवर वाचनालय निर्मितीसाठी मंगळवारी आमसभेत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विशिष्ट समाजाच्या दुखावलेल्या भावनांना महापालिकेने न्याय दिल्याचे स्पष्ट झाले. यासाठी नगरसेवक प्रदीप दंदे यांनी मोलाची भूमिका बजावली.महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर चरणजितकौर नंदा यांच्या पीठासीनाखाली आमसभा पार पडली. आयुक्त चंद्रकांत गुडेवार, उपमहापौर शेख जफर, नगरसचिव मदन तांबेकर यांनी कामकाजात सहभाग घेतला. दरम्यान नगरसेवक दंदे यांनी अर्जुननगरातील अतिक्रमित धार्मिक स्थळाबाबत सविस्तर माहिती सादर केली. प्रशासनाने पहाटे पाच वाजता पोलीस बंदोबस्तात हे स्थळ हटविण्याची कारवाई केली. प्रशासन अतिक्रमित धार्मिक स्थळ हटविताना पक्षपात करीत असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही, असे दंदे म्हणाले. महिलांच्या मागणीनुसार सावित्रीबाई फुले वाचनालयासाठी जागा देण्याबाबतचा प्रस्ताव असून याला मान्यता प्रदान करावी, अशी मागणी दंदे यांनी केली. त्यानंतर नगरसेवक अजय गोंडाणे, प्रकाश बनसोड, मालती दाभाडे, अंबादास जावरे, निर्मला बोरकर, भूषण बनसोड, गुंफाबाई मेश्राम, दीपमाला मोहोड आदींनी अतिक्रमण हटविल्याबाबत संताप व्यक्त केला. चर्चा सुरु असताना प्रेक्षक गॅलरीत अर्जूननगरातील महिला मोठ्या संख्येने हजर होत्या. दरम्यान या महिलांकडून गोंधळ घालण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता. दरम्यान शिवसेनेचे प्रशांत वानखडे, दिगंबर डहाके, प्रवीण हरमकर, प्रदीप बाजड, राजेंद्र तायडे, मंजुषा जाधव आदींनी मत नोंदविले. मात्र परिसरातील सदस्य स्वाती निस्ताने, राजू मानकर यांचे मत जाणून घेण्याबाबत चर्चा झाली.सदस्यांच्या मागणीनुसार परिसरातील दोन्ही सदस्यांना विश्वासात घेवून अर्र्जूननगरातील खुल्या भुखंडातील १० टक्के जागा ही वाचनालयास देण्याचा ठराव पारीत झाला. या विषयाला मंजूर व कायम करण्याचा निर्णय घेतला.-चरणजितकौर नंदा, महापौर, महापालिका.