शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

असेसमेंटला चार दिवस

By admin | Updated: April 26, 2015 23:59 IST

महापालिका उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असलेल्या स्थानिक संस्था (एलबीटी) कराचे चालू वर्षाचे विवरणपत्र सादर ...

एलबीटी : कायदेशीर कारवाई होणारअमरावती : महापालिका उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असलेल्या स्थानिक संस्था (एलबीटी) कराचे चालू वर्षाचे विवरणपत्र सादर करण्यासाठी व्यापाऱ्यांना आता केवळ चार दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. ३० एप्रिलपर्यंत विवरणपत्र सादर करण्यात आले नाही तर कारवाईच्या सामोरे जावे लागेल, अशा सूचना नोटीसद्वारे देण्यात आल्या आहेत.१ जुलै २०१२ पासून महापालिकेत एलबीटी लागू करण्यात आला असून लेखा अंकेक्षणावर ही कर प्रणाली आहे. आतापर्यंत शहरात १० हजार ६७७ प्रतिष्ठानांची एलबीटी नोंदणी करण्यात आली आहे. २०१२- २०१३ व २०१३- २०१४ या आर्थिक वर्षांचे विवरणपत्रे सादर न करणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटीस बजावून ते भरुन देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. काही व्यापाऱ्यांनी विवरणपत्र सादर करताना आवश्यक कागदपत्रे दाखल केली नाहीत. परिणामी विवरणपत्रातील तृट्या दूर करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यात यावी. एलबीटी कार्यालयाने मागितलेले कागदपत्रे व्यापाऱ्यांनी सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा महापालिका अधिनियम १९४९ (एलबीटी नियम, २०१०) मधील तरतुदीनुसार कारवाईच्या सामोरे जावे लागेल, असे नोटीशीत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी म्हटले आहे. आतापर्यंत ८५८६ इतक्या व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. २०१२ - २०१३ चे कर मूल्यनिर्धारण झालेल्या प्रतिष्ठानांची संख्या १५६४ एवढी आहे. कर मूल्यनिर्धाणपोटी आठ कोटींची रक्कम येणे अपेक्षित आहे. नोटीस बजावून व्यापाऱ्यांना अवगत करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात एलबीटीचे नियोजन ठरणार असल्याची माहिती आहे.आतापर्यंत वसूल झालेली एलबीटीची रक्कम१ जुलै २०१२ पासून एलबीटी लागू करण्यात आला आहे. यात २०१२ या आर्थिक वर्षात एलबीटीचे उत्पन्न ४१.१२ कोटी, रहदारी शुल्क ७ कोटी, मुद्रांक शुल्क उत्पन्न २.२३ कोटी असे एकूण ५०.४५ कोटी रुपये तिजोरीत जमा झाले आहेत. तसेच २०१३- २०१४ या वर्षांत एलबीटीचे उत्पन्न ७४.५४ कोटी, रहदारी शुल्क ९.७४ कोटी, मुद्रांक शुल्क ५.६१ असे एकूण ८९.९२ कोटी रुपये जमा झाले होते. २०१४- २०१५ या आर्थिक वर्षात एलबीटी वसुली ७३.३२ कोटी, रहदारी शुल्क ३.८४ कोटी तर मुद्रांक शुल्क ३.४० कोटी असे एकूण ८०.५६ कोटी रुपये वसूल केले आहेत.