शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज दुरूस्तीची सुविधा मृतांच्या वारसांनाही लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 22:30 IST

कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेत मृतांच्या वारसांना आणि पती-पत्नी दोघांनाही लाभ मिळणार काय,

ठळक मुद्देकर्जमाफीचे अर्ज : पोर्टलची गतीवाढ, केंद्रचालकांना जिल्हाधिकाºयांची तंबी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेत मृतांच्या वारसांना आणि पती-पत्नी दोघांनाही लाभ मिळणार काय, शिवाय आई व मुलाचे संयुक्त खाते असतानाही कर्ज वेगवेगळे असेल तर कर्जमाफीचा लाभ कोणाला, यांसह अन्य शंकांचे निरसन करण्यात आले आहे. आॅनलाईन अर्जात दुरूस्ती करता येत असल्याने प्रक्रियेतील दोषनिवारण झाले आहे.शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करून थकबाकीदार शेतकºयांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला असून नियमित कर्जफेड करणाºयांनाही प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ३०० केंद्रांद्वारे मोफत अर्ज भरण्यात येत आहेत. आता सर्व्हरची गती वाढली असली तरी अनेक अडचणी आहेत. केंद्रचालक शेतकºयांचे पुरेसे समाधान करीत नसल्याने गोंधळात भर पडली आहे. परंतु शासनाने शेतकºयांसमक्ष उद्भवणाºया संभाव्य शंकांचे समाधान करणारी माहिती जाहीर केल्याने प्रक्रिया सोपी झाली आहे. मृतांच्या वारसांनी कर्जखात्यावर वारसनोंद करण्यासाठी बँकेकडे अर्ज करावा व बँकांनी नोंदी करून द्याव्यात, बँकेने मृताच्या कर्जखात्याची विभागणी करून रक्कम निश्चित करावी, वारसांनी कर्जाचा तपशील स्वत:च्या माहितीत समाविष्ट करावा. भूमी अभिलेखाच्या नोंदीला उशिर होणार असेल तर प्रत्येक वारसाला कुटूंबासाठी करावयाच्या अर्जामध्ये मृत नातेवाईकांच्या विभाजीत कर्जखात्याचा तपशील नमूद करावा लागेल.प्रत्येक कुटुंबाला दीड लाखापर्यंत मिळणार लाभआई व मुलाचे संयुक्त खाते आहे. मात्र, कर्ज स्वतंत्र असल्यास व मुलगा सज्ञान असल्यास त्याने व आईने स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे. त्यांना स्वतंत्ररित्या प्रत्येक कुटुंबाला दीड लाखांपर्यंत लाभ मिळू शकतो. मात्र, मुलगा १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा असल्यास आईने दाखल केलेल्या अर्जातच अज्ञान मुलाच्या कर्जाचा तपशील समाविष्ट करावा लागणार आहे.वेगवेगळ्या बँकांच्या दोन कर्जांसाठी एकच अर्जएकाच व्यक्तीने दोन वेगळ्या बँकांकडून कर्ज घेतले असेल किंवा पती-पत्नीने दोन बँकांचे कर्जधारक असतील कर्ज घेतले असल्यास दोगांना कुटूंबाच्या व्याख्येनुसार एकच अर्ज भरावा लागेल. अशा प्रकरणात प्रती कुटूंब दीड लाख रूपयांचा लाभ मिळेल. मात्र, कर्ज दीड लाखांपेक्षा अधिक असल्यास त्यावरील रक्कमेचा भरणा केल्यानंतरच दीड लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल.अल्पवयीन कर्जधारक सज्ञान झाल्यास कर्जमाफीचा लाभमुलगा अल्पवयीन असताना शेतकºयाने कर्ज घेतले होते. मात्र, आता मुलगा सज्ञान झाला असल्यास त्याला कर्जमाफीसाठी स्वतंत्र अर्ज करता येतो किंवा कुटूंबप्रमुख यानात्याने वडिलांनाी अर्ज करता येईल. पती-पत्नीचा घटस्फोट झाला नाही मात्र ते विभक्त असल्यास कर्जदार शेतकºयाने पत्नीच्या माहितीसह आॅनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.