शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१६ पासून भरता येणार दहावी, बारावी परीक्षेसाठी १७ नंबरचा अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:16 IST

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खाजगीरीत्या प्रविष्ट होण्यासाठी १७ ...

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खाजगीरीत्या प्रविष्ट होण्यासाठी १७ नंबरचा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना १६ सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.

राज्य मंडळ याबाबतचे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. आर्थिक दुर्बल घटकातील अनेक विद्यार्थी १७ नंबरचा अर्ज भरून दहावी, बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होतात. त्याप्रमाणे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे अनेक विद्यार्थी काम करतात. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ शिक्षण घेता येत नाही. या सर्व विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीची परीक्षा देता यावी, याकरिता शिक्षण मंडळाकडून परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होण्याची संधी दिली जाते. त्यासाठी या विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज आणि शुल्क भरावे लागते. राज्य मंडळाकडून परिपत्रकानुसार, विद्यार्थ्यांना १६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज आणि शुल्क भरावयाचे आहेत. यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज शुल्क भरण्याची पावती दोन प्रतीत मूळ कागदपत्रे १७ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत निवडलेल्या शाळा किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये जमा करावयाचे आहे. विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज, शुल्काची पावती, मूळ कागदपत्रे आणि विद्यार्थ्यांची यादी विभागीय शिक्षण मंडळाकडे १८ ऑक्टोबरला जमा करावयाची असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी दिली.