शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:03 IST

भोंदूबाबा पवन महाराजने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यासंदर्भात गाडगेनगर पोलीस बुधवारी न्यायालयात 'से' दाखल करण्यासाठी गेले होते. पवन महाराजाच्या जामिनावर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देगुरुवारी सुनावणी : पोलिसांना मिळेना ‘करंट लोकेशन’

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भोंदूबाबा पवन महाराजने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यासंदर्भात गाडगेनगर पोलीस बुधवारी न्यायालयात 'से' दाखल करण्यासाठी गेले होते. पवन महाराजाच्या जामिनावर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.पवन घोंगडेविरुद्ध १६ मे रोजी तक्रार दाखल केली गेली. त्याच दिवशी गाडगेनगर पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. यानंतरही अटक न झाल्याने त्याची भोंदूगिरी काही दिवस सुरूच होती. प्रकरण पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे गेल्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी पवनच्या आई-वडिलांना अटक केली. त्याला आता आठवडा उलटला तरी पवन घोंगडे पोलिसांपासून दूर राहिला. एवढा कालावधी उलटल्यामुळे त्याला अटकपूर्व जामिनाची संधी मिळाली आहे. यासाठी त्याच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज सादर केला आहे, तर गाडगेनगर पोलिसांनी पवन महाराजाविरुद्ध मजबूत 'से' दाखल केला आहे.दोन पथके पवनच्या शोधातमहिनाभरापासून गाडगेनगर पोलीस आरोपी पवन घोंगडेचा शोध घेत आहेत. मात्र, तो पोलिसांना अद्याप गवसला नाही. गाडगेनगर ठाण्यातील डीबीचे एक पथक बाहेरगावी, तर एक शहरातच पवनचा शोध घेत आहे. मात्र, अद्याप या भोंदूबाबाचे लोकेशन पोलिसांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे.पवन घोंगडेने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर स्ट्राँग 'से' तयार करून न्यायालयात दाखल केला आहे. अद्याप पवनचे करंट लोकेशन मिळाले नसून, दोन पथक त्याचा शोध घेत आहेत.- मनीष ठाकरे, निरीक्षक, गाडगेनगर ठाणे