शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कुठल्याही व्यासपीठावर राणांशी चर्चेस तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:46 IST

आमदार रवि राणा यांच्याशी जनतेच्या साक्षीने कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास मी तयार आहे, अशा शब्दांत खासदार अनंदराव अडसूळ यांनी आमदार रवि राणा यांनी दिलेले आव्हान स्वीकारले.

ठळक मुद्देपत्रपरिषदेत खासदारांची कबुली : सिटी बँकमध्ये अनियमितता; चौकशी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आमदार रवि राणा यांच्याशी जनतेच्या साक्षीने कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास मी तयार आहे, अशा शब्दांत खासदार अनंदराव अडसूळ यांनी आमदार रवि राणा यांनी दिलेले आव्हान स्वीकारले.सिटी बँकमध्ये काही प्रमाणात अनियमितता झाली, हे मान्य आहे. सीईओंनी बोर्डाच्या संमतीशिवाय कर्जवाटप केल्याने चेअरमन या नात्याने हे प्रकरण ‘ईओडब्ल्यू’ विभागाकडे चौकशीसाठी दिले आहे. या व्यवहाराचे आॅडिट करायला सहकार विभागाला सांगितले आहे. बँकेच्या दुखावलेल्या व कर्जबुडव्या खातेदारांना हाताशी धरून आपली प्रतिमा मलीन करण्याचा उद्योग राणांनी आरंभला असल्याचा आरोप खा. अडसूळ यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला.आ. रवि राणा व खा. आनंदराव अडसूळ यांच्यात अलीकडे घमासान सुरू आहे. शनिवारी आ. राणा यांनी पत्रपरिषद घेऊन खासदार व त्यांच्या स्वीय सहायकाविरोधात केलेल्या आरोपांचे सोमवारी खासदारांनी पत्रपरिषदेत खंडन केले आणि आ. राणांवर पलटवार केला. सुनील भालेराव यांच्यावरदेखील सिटी बँकेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप राणांनी केला. प्रत्यक्षात भालेराव हे खातेदारच नसल्यामुळे कर्जदार कसे होतील? ७२ लाखांचा एक ओव्हरड्राफ्ट आहे. तो एक्स्चेंज करता येईल. बँकेच्या चार नव्हे, तर दोन खातेदारांच्या आत्महत्या झाल्या आहेत. ८०० कोटींचा व्यवहार असलेल्या बँकेत ९०० कोटींचा भ्रष्टाचार कसा होईल, असा सवाल अडसुळांनी केला. त्यामुळेच राणांनी आता ४०० कोटींवर आकडा आणला आहे. डॉ. सुुनील जाधव यांना कर्ज देण्यासाठी २० टक्के कमिशन घेतल्याचा आरोप राणांनी केला होता. यावर खासदार म्हणाले, जाधव यांना फक्त तीन महिन्यांपासून ओळखतो. त्यांचे कर्जप्रकरण २०१४ मधील आहे.

राणांना खासदारकीचा अर्थच कळलेला नाहीबँकेत अनियमितता झाल्यानेच आपण पुढाकार घेऊन तक्रार दाखल केली. रिझर्व बँकेने आता बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आणल्याने खातेदारांच्या विड्रॉलवर परिणाम झाला. नोटाबंदीच्या काळात वाढलेला एनपीए भरून निघत नसल्याने आरबीआयच्या नोटीसद्वारे बँकेने ९० कोटींचा एनपीए ७० कोटींवर आणला व इतर खातेदारांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई आता सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.माध्यम व सोशल मीडियातून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आ. राणा करीत असल्यानेच २५ जून रोजी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या दिशानिर्देशानुसार चौकशी होऊन २९ जुलै रोजी आ. राणांवर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे राणांनी पत्नीच्या पदराआड लपून माझ्या व माझे खासगी सचिव सुनील भालेराव, कार्तिक शहा व माहिती अधिकार कार्यकर्ता जयंत वंजारीविरुद्ध खंडणी व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा पहाटे ३.२२ वाजता दाखल केला असल्याचा आरोप खा. आनंदराव अडसूळ यांनी केला. पत्रपरिषदेला शिवसेचे जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, सुनील खराटे, प्रशांत वानखडे, महानगरप्रमुख प्रवीण हरमकर, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने, वर्षा भोयर आदी उपस्थित होते.केवळ तक्रारी दाखल करण्यासाठी राणांनी माणसे पोसली आहेत. कामावर असणाºया मागासवर्गीय समाजाच्या महिलेकरवी रिपोर्ट दाखल करून १३ लोकांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. या सर्व अन्य बाबी नवीन सीपींच्या निर्दशनात आणून दिल्या. न घडलेल्या गोष्टीची तक्रार करणारी औलाद आम्ही नाही. संस्कृती कशासोबत खातात, हे आम्हाला राणांकडून शिकून घेण्याची गरज नाही. राणांना आमदारकीचा अर्थच कळला नसल्याचा टोमणा खा. अडसूळ यांनी मारला.

गाडगेनगर ठाणेदाराला दाखविली सेनेची ताकदगाडगेनगर ठाण्यात आठ दिवसांपूर्वी सपुरावा तक्रार दाखल केल्यानंतर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नाही. किंबहुना गाडगेनगरचे ठाणेदार याकडे दुर्लक्ष करतात. रजेवर होतो असे सांगतात. ज्यांच्याकडे चार्ज होता, तेदेखील हात वर करतात. मात्र, राणांच्या तक्रारीवर पहाटे ३.२२ वाजता गुन्हा दाखल होतो. शनिवारी सर्व पदाधिकाऱ्यांनी गाडगेनगर ठाण्यात धडक दिली. सर्व आक्रमक झाल्यानंतर रवि राणा, सुनील राणा, अनूप अग्रवाल, भेंडे यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे खासदारांनी सांगितले.-हा तर मुख्यमंत्र्यांचा दुबळेपणा !रवि राणा पालकमंत्र्यांना पालकमंत्री नव्हे, तर बालकमंत्री म्हणतात. त्यांच्या कानाखाली काढायची धमकी देतात. त्यांची औकात नाही, ते असे बोलतात; मात्र त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. उलट प्रशासनच त्यांना मदत करते. त्यामुळे रवि राणा काहीही करू शकतात, असा भ्रम पोलिसांमध्ये पसरला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा हा दुबळेपणा आहे.म्हणून राणांच्या सासऱ्यांविरोधात तक्रारजयंत वंजारी यांच्याशी आ. राणा, नवनीत राणा, अविनाश काळे व एक कंत्राटदार संपर्कात असल्याची शंका आली. वंजारी यांनी दाखल केलेल्या प्रकरणात, आ. राणा कागदपत्रांचा घोळ घालून जात प्रमाणपत्र पडताळणी समितीद्वारा त्यांच्या पत्नीच्या बाजूने निकाल लावणार असल्याची शंका आल्याने राणांच्या सासऱ्याविरोधात तक्रार नोंदविली. यामुळे समितीने वडिलांचे जात प्रमाणपत्र रद्द व मुलीचे प्रमाणपत्र वैध असा अजब-गजब निकाल दिल्याचे खा. अडसूळ म्हणाले.