शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आणखी २१ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 01:27 IST

जिल्ह्यात आणखी २१ डेंग्यूरुग्ण आढळून आले आहेत. साईनगर परिसरातील दोघे भावांना डेंग्यूचे निदान झाले. अमरावती व बडनेरा परिसरात सर्वाधिक डेंग्यूरुग्ण आढळून आले असून, आरोग्य प्रशासनाचे स्वच्छता अभियान थंडावल्यामुळे घरोघरी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

ठळक मुद्देदोन भावांना डेंग्यूची बाधा : प्रतिबंधात्मक उपाययोजना केव्हा?

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात आणखी २१ डेंग्यूरुग्ण आढळून आले आहेत. साईनगर परिसरातील दोघे भावांना डेंग्यूचे निदान झाले. अमरावती व बडनेरा परिसरात सर्वाधिक डेंग्यूरुग्ण आढळून आले असून, आरोग्य प्रशासनाचे स्वच्छता अभियान थंडावल्यामुळे घरोघरी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.डेंग्यूचे थैमान थांबविण्यासाठी पुन्हा सक्षमपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे झाले असल्याचे रुग्णांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. राजापेठ येथील डॉ. राजेश मुंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपुर्वी ते दाखल झाले. साईनगर परिसरातील रहिवासी २९ व २७ वर्षीय दोेन भावांना डेंग्यूची लागण झाली आहे. लहान भावाच्या रक्तातील पांढऱ्या पेशी २९ हजारावर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राजापेठ परिसरातील ५० वर्षीय महिलेला डेंग्यू झाला आहे, तर कारंजा लाड येथून १६ वर्षाचा मुलगा उपचारासाठी दाखल झाला आहे. गोपालनगरातील ३४ वर्षीय पुरुष डेंग्यूने बाधित असून, त्यांच्या रक्तातील पांढºया पेशीसुद्धा २९ हजारांपेक्षा कमी असल्याने सतर्कतेने उपचार सुरू आहे. राजापेठ येथील श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये पाच नवीन डेंग्यूरुग्ण दाखल झाले. यामध्ये साईनगर परिसरातील ३२ वर्षीय महिला, पन्नालालनगर येथील ३५ वर्षीय महिला, लाडेगाव येथील ३५ वर्षीय पुरुष, गणेश कॉलनी येथील १९ वर्षीय मुलगी, तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अडगाव येथीेल १६ वर्षीय मुलगी आहे. डॉ. पंकज बागडे यांच्या हॉस्पिटलमध्ये पाच डेंग्यूरुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात १८ वर्षीय मुलगा (धामणगाव रेल्वे), ६० वर्षीय महिला (उत्तमनगर), हर्षराज कॉलनीतील दोन व यशोदानगरातील एक रुग्ण आहे. डॉ. हरीश बाहेती यांच्या हॉस्पिटलमध्ये बडनेरा येथील ६५ वर्षीय महिला, राजापेठ येथील १९ वर्षीय मुलगा यांना उपचाराअंती सुटी देण्यात आली.डॉ. संदीप मलिये यांच्या हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन दिवसांत १५ वर्षीय मुलगा (अमरावती), ४५ वर्षीय महिला (फरशी स्टॉप), २४ वर्षीय मुलगा (अर्जुननगर) दाखल आहेत. मागील आठवड्यात डेंग्यूने धामणगाव येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता तरुणाचा पुणे येथे उपचारदरम्यान मृत्यू झाला.स्वच्छता मोहीम राबविणे सुरूच आहे. ती आता पुन्हा सक्षमपणे राबविण्यात येणार आहे. फॉगिंग मशीनद्वारे धूरळणीसुद्धा करण्यात येणार आहे. नागरिकांनी ताप अंगावर काढू नये. सर्तकता बाळगून तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा.- संजय निपाणे, आयुक्त महापलिका, अमरावतीपाच डेंग्यू रुग्णांवर उपचार सुरू असून, दोन रुग्णांच्या शरीरातील पांढºया पेशी या २९ हजार आहेत. दररोज दोन ते तीन डेंग्यूरुग्ण येत आहेत.- डॉ. राजेश मुंदे, एमडी मेडिसीन, अमरावती.

टॅग्स :dengueडेंग्यू