शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

दुष्काळ जाहीर, मदत केव्हा ?

By admin | Updated: May 15, 2016 00:02 IST

शासनाने २३ मार्च रोजी जिल्ह्यातील १९६७ गावांमध्ये ५० पैशांच्या आत पैसेवारी असल्याने 'दुष्काळसदृश स्थिती' जाहीर केली ...

प्रशासन गप्प : लोकप्रतिनिधी केव्हा घेणार दखल ?अमरावती : शासनाने २३ मार्च रोजी जिल्ह्यातील १९६७ गावांमध्ये ५० पैशांच्या आत पैसेवारी असल्याने 'दुष्काळसदृश स्थिती' जाहीर केली व उच्च न्यायालयाच्या आदेशाने ११ मे रोजी 'सदृश' हा शब्द वगळून दुष्काळ स्थिती जाहीर केली आहे. यापूर्वीच्या विविध उपाययोजना कायम राहतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे जिल्ह्यातील १९६७ दुष्काळी गावांत केंद्राच्या १३ मे २०१५ रोजीच्या नैसर्गिक आपत्ती (एनडीआरएफ) या निर्णयान्वये सवलती द्यायला पाहिजे. यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने घेत शासन, प्रशासनावर दबाव निर्माण करणे गरजेचे आहे.गतवर्षीच्या खरीप हंगामात पेरणीपासून पावसात खंड, यामुळे दुष्काळ स्थिती निर्माण झाली. त्यामुळे शासनाने २० आॅक्टोबर २०१५ रोजी राज्यातील १५ हजार ७४७ गावांत दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली व एनडीआरएफच्या निकषानुसार दुष्काळी निधी दिला. यामध्ये विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील १४२०, अकोला ५१ व यवतमाळ जिल्ह्यातील २ गावांना याचा लाभ मिळाला. मात्र उर्वरित गावे वंचित राहिली. जनहित याचिकेवर मुंबई न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनास फटकार दिला असता शासनाने २३ मार्च रोजी विदर्भातील ११ हजार ८६२ गावांत दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली.यामध्ये जिल्ह्यातील १९६७ गावांचा समावेश आहे. शासनाने २३ मार्च २०१६ च्या शासन निर्णयानुसार सवलती जाहीर केल्या. उच्च न्यायालयाने ११ मार्च २०१६ केली व शासनाने जिल्ह्यासह विदर्भातील ११ हजार ८६२ गावात दुष्काळ जाहीर केला, मात्र दुष्काळाच्या कुठल्याच सोई सवलती दिल्या नाहीत जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी यांनी दुष्काळी गावांना दिलासा देण्याची गरज आहे. तसेच जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींनीदेखील शासन, प्रशासनावर दबाव निर्माण करून या दुष्काळी स्थितीत दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)जाहीर केलेल्या सवलतीअमरावती व नागपूर विभागातील ११ हजार ८६२ गावांत शासनाने २० नोव्हेंबर २०१५ च्या निर्णयाप्रमाणे जमीन महसूल सूट, कृषिपंपांच्या देयकात ३३.५ टक्के सूट, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, पाणी पुरवठ्यासाठी टँकर, कृषिपंपांची वीजजोडणी खंडित न करणे, शेतीशी निगडित कर्ज वसुलीत स्थगिती, पीक कर्जाचे पाच वर्षांत पुनर्गठन व पीक विम्याच्या ५० टक्के प्रमाणात कापूस व सोयाबीन पिकासाठी भरपाईचा सवलती जाहीर केली आहे.दुष्काळासाठी अशी मिळायला हवी मदतराज्यात दुष्काळ जाहीर झाल्याने केंद्र शासनाच्या १३ मे २०१५ च्या नैसर्गिक आपत्ती (एन.डी.आर.एफ/एस.डी.आर.एफ) या निकषानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रतीहेक्टर ६८०० रुपये, फळपिके व भाजीपाला पिकांसाठी १३,५०० रुपये व बहूवार्षिक पिकांसाठी प्रतीहेक्टरी १८,००० रुपये अशी मदत शेतकऱ्यांना करायला पाहिजे ही मदत विदर्भ वगळता राज्यातील अन्य जिल्ह्याला शासनाने यंदा दिली आहे.शासनाने केला शब्दच्छलयापूर्वी उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर शासनाने २३ मार्चच्या निर्णयान्वये विदर्भातील ११,८६२ गावात 'दुष्काळ सदृश्यस्थिती' जाहीर केली पुन्हा न्यायालयाने ११ मे रोजी कानउघडणी केल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थितीऐवजी 'दृष्काळ' वाचावे असा शासन निर्णय ११ मे २०१६ रोजी काढला. कुठलीही सवलत न देता हा शब्दांचा खेळ शासनाने केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केली आहे. दुष्काळी सवलतीची प्रतीक्षा आहे.