शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

नऊ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:24 IST

राज्य शासनाने १८७ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. मात्र, यात जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा समावेश नाही

ठळक मुद्देरवि राणा : सातबारा कोरा करून न्याय द्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाने १८७ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. मात्र, यात जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा समावेश नाही. त्यामुळे अगोदर पाच तर नव्याने नऊ असे १४ तालुक्यांचा समावेश करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी बडनेरा मतदारसंघाचे आ.रवि राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.मुख्यमंत्री फडणवीस हे येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात दिवंगत नेते रा. सू. गवई यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आले असता, त्यांना जिल्ह्यातील भातकुली, अमरावती, तिवसा, दर्यापूर, धारणी, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्र्वर या नऊ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. खरीप हंगाम हातून गेले. अपुºया पावसामुळे पीक उत्पादन घटले. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात असून, त्याला आधार देणे काळाची गरज असल्याचे आ. राणा म्हणाले. सरसकट प्रति एकरी ३० हजार रूपये नुकसान भरपाई देऊन शेतकºयांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी शासनाने पाऊल उचलावे, अशी मागणी त्यांनी केली. सततची नापिकी आणि आर्थिक विंवचनेत असलेल्या शेतकºयांना येत्या काळात भीषण प्रसंगाचा सामना करण्यापूर्वी शासनाने मदतीचा हात पुढे करावा, असेही निवेदनातून म्हटले आहे. यावेळी राजू रोडगे, दिनेश टेकाम, मयुरी कावरे, जया तेलखडे, उमेश ढोणे, प्रदीप थोरात, मीनल डकरे, अभिजित देशमुख, लता रायबोले, अब्दूल रफिक आदी उपस्थित होते.