शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना महामारीची वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 05:00 IST

मुमताजच्या कुटुंबातील २४ सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे सर्व जण आता ठणठणीत बरे झाले आहेत. या सर्व सदस्यांकडून कुटुंबीयांसह इतरांचीही काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे, आरोग्य यंत्रणेला मोठे सहकार्य या कुटुंबाकडून मिळत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.

ठळक मुद्दे४ एप्रिल रोजी आढळला होता पहिला रुग्ण, आतापर्यंत ४९५२३ कोरोनाग्रस्तांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ४ एप्रिल २०२० रोजी आढळून आला होता. मृत्यू झाल्यानंतर तो कोरोना संक्रमित असल्याचे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले होते. हाथीपुरा येथील ४० वर्षीय मुमताज ऑटोवाला तथा मुमताज अहमद खान असे या जिल्ह्यातील पहिल्या कोरोना संक्रमिताचे नाव आहे. त्याचा घरीच मृत्यू झाला होता.मुमताजच्या कुटुंबातील २४ सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे सर्व जण आता ठणठणीत बरे झाले आहेत. या सर्व सदस्यांकडून कुटुंबीयांसह इतरांचीही काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे, आरोग्य यंत्रणेला मोठे सहकार्य या कुटुंबाकडून मिळत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.कोरोना रुग्णांवर वेळीच उपचार होण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने खासगी व सरकारी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, कोविड केअर आराेग्य केंद्र तर डेडिकेडेट कोविड हाॅस्पिटल असे एकूण ४५ दवाखाने उपलब्ध केले आहे.

पुरेसा औषधसाठाजिल्ह्यात २६ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, १५ कोविड केअर आराेग्य केंद्र तर,चार डेडिकेडेट कोविड हाॅस्पिटल कार्यरत आहे. कोरोना संक्रमित रूग्णांवर ४५ ठिकाणी उपचार सुरु आहे. या सर्व खासगी, सरकारी दवानखान्यात आयसीयू, ऑक्सीजन, व्हेन्टिलेटर आणि जनरल बेडसह औषधी साठा पुरेसा असल्याची माहिती आहे. तसेच कोरोना रूग्णांंवर होणाऱ्या उपचार दरावरही जिल्हा प्रशासनाने नियंत्रण चालविले आहे.

दुसरा पॉझिटिव्ह कुटुंबीयांची जबाबदारी हाताळतोय

जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबातील २४ सदस्यांना पीडीएमसीत क्वांरटाईन करण्यात आले. त्यापैकी चार जण संक्रमित आढळून आले होते.

चार पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर जणांना येथील सुपर स्पेशालिटी कोरोना रुग्णालयात उपाचासाठी दाखल केले होते. यात मृत संक्रमिताची पत्नी, दोन भाऊ व मुलाचा समावेश होता.

मृत संक्रमिताचा धाकटा भाऊ ठणठणीत आहे. तो कुटुंबीयांची काळजी घेतो. ऑटोरिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा हाकत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या